चिखलदरा नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:41+5:302021-02-05T05:32:41+5:30
चिखलदरा : स्थानिक नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची निवड शुक्रवारी दुपारी २ वाजता अविरोध पार पडली. तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी ...

चिखलदरा नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची अविरोध निवड
चिखलदरा : स्थानिक नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची निवड शुक्रवारी दुपारी २ वाजता अविरोध पार पडली.
तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी माया माने, मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांच्या उपस्थितीत बांधकाम सभापतिपदी राजेश मांगलेकर, शालेय शिक्षण सभापतिपदी अरुण तायडे, महिला व बाल कल्याण सभापतिपदी वंदना गवई व स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष विजय सोमवंशी यांची निवड जाहीर करण्यात आली. महिला व बाल कल्याण उपसभापतिपदी प्रमिला कंदिलवार यांची निवड झाली. आरोग्य व स्वच्छता सभापतिपदी उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर यांच्याकडे आहे. नगराध्यक्ष विजया राजेंद्रसिंह सोमवंशी, उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, नगरसेवक राजेंद्र सोमवंशी, सुवर्णा चंदामी, सर्व उपस्थित नगरसेवकांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. नगरपालिकेचे लेखापाल प्रमोद वानखडे, अनिकेत लहाने व सहकर्मचारी यांनी निवडणुकीचे कामकाज हाताळले.