महापालिकेत विनाकारणची गर्दी जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:27+5:302021-03-04T04:21:27+5:30
(फोटो/मनीष) अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गात गर्दी करणे महत्त्वाचे असताना, महापालिकेच्या आवारात अकारण लोकांचा वावर दिसून येत आहे. याला ...

महापालिकेत विनाकारणची गर्दी जास्त
(फोटो/मनीष)
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गात गर्दी करणे महत्त्वाचे असताना, महापालिकेच्या आवारात अकारण लोकांचा वावर दिसून येत आहे. याला पुरेसा अटकाव होताना दिसत नाही तसेच पल्स ऑक्सिमीटर व थर्मल स्क्रीनिंगद्वारे एकाही नागरिकांची तपासणीदेखील होत नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाद्वारे दोन गार्ड लावले असले तरी त्यांना न जुमानता कामापेक्षा अआरण येणाऱ्या नागरिक असल्याचे निरीक्षण आहे. याशिवाय अनेक नागरिक दुचाकी सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेच्या पार्किंगचा वापर करताना दिसून येत आहे. या सर्व प्रकारांमध्ये शहराच्या मध्यभागी व सर्व बाजारपेठ जवळ असलेल्या महापालिकेत कोरोनाकाळात नागरिकांची गर्दी करत असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३५ हजारांवर व त्यापैकी महापालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक २२ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता महापालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक संसर्ग अमरावती शहरात असताना, महापालिका प्रशासनाद्वारे या गर्दीला अटकाव करणे गरजेचे झाले आहे.