नपुंसक पतीचे पत्नीशी अनैसर्गिक कृत्य, सासरा-दीराशी संबंध ठेवण्याचा किळसवाणा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:18 IST2018-05-25T23:17:20+5:302018-05-25T23:18:04+5:30
मधुचंद्राच्या रात्री पती जवळ येत नव्हता. तिनेच पुढाकार घेतला. मात्र, आधी मित्र बनू, असे म्हणत पतीने वेळ टाळली. दहा दिवसानंतर पत्नीने हा घटनाक्रम सासरच्या मंडळीच्या कानावर टाकताच पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले.

नपुंसक पतीचे पत्नीशी अनैसर्गिक कृत्य, सासरा-दीराशी संबंध ठेवण्याचा किळसवाणा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मधुचंद्राच्या रात्री पती जवळ येत नव्हता. तिनेच पुढाकार घेतला. मात्र, आधी मित्र बनू, असे म्हणत पतीने वेळ टाळली. दहा दिवसानंतर पत्नीने हा घटनाक्रम सासरच्या मंडळीच्या कानावर टाकताच पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पतीला लैंगिक समस्या असल्यामुळे मूल कसे होणार, या विवंचनेत पत्नी होती. त्यातच सासरा व दीरासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला सासरच्यांकडून मिळाल्याने विवाहितेला धक्काच बसला. या गंभीर प्रकाराची तक्रार पीडितेने शुक्रवारी फे्रजरपुरा पोलिसांकडे नोंदविली असून, पोलिसांनी शिक्षक पतीसह सासरा व दिराला अटक केली.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, फे्रजरपुरा हद्दीतील रहिवासी ३० वर्षीय तरुणीचा २४ सप्टेंबर २०१७ रोजी एका तरुणासोबत अकोला जिल्ह्यातील दहीहांडा येथे विवाह झाला. माहेरच्यांनी दोन लाख व सोन्याचे दागिने म्हणून सासरच्यांना हुंडा दिला. विवाहानंतर २७ सप्टेंबर रोजी सासरची मंडळी मुलीला घ्यायला आली. २८ सप्टेंबर रोजी नवदाम्पत्याची मधुचंद्राची रात्र होती. नववधू पतीच्या खोलीत गेली असता, तो हजर नव्हता. पत्नीने मध्यरात्रीपर्यंत पतीची प्रतीक्षा केली. अखेर मध्यरात्री २ वाजता पती खोलीत दाखल झाला. मात्र, तो पत्नीजवळ न जाता खोलीत पुस्तक वाचत बसला. हा प्रकार बघून पत्नी जवळ गेली आणि तिने पतीला स्पर्श केला. पती जोरात ओरडला. त्यामुळे सासरची मंडळी धावून आली. तिने समजावून सांगितले. त्यानंतर आपण आधी मित्र बनू आणि त्यानंतर पती-पत्नी, असे त्याने सांगितले. त्या दिवसापासून दिवाळीच्या सुट्यांमध्ये अमरावतीत आले. त्यावेळीसुद्धा ते दाम्पत्यजीवनात नव्हते.
सासरा, दीराची वाकडी नजर
विवाहितेने हा प्रकार सासरच्या मंडळीच्या कानावर टाकला असता, पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर नवदाम्पत्य अकोट येथे राहायला गेले. तेथील एका शाळेवर ती मुलगी शिक्षिका आहे.
यादरम्यान लग्नात आंदण दिले नाही म्हणून सासरची मंडळी तिला टोमणे मारून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. याच सुमारास पतीला लैंगिक समस्या असल्याचे पत्नीला कळले. हा प्रकार तिने सासरच्यांना सांगितले. मला मूल हवे, असे सांगितले असता, कुटुंबातील एका सदस्याने सासरा व दीर मूल देतील, असे सांगितले. त्यानंतर सासरा व दीर हे दोघेही तिच्याशी जवळीक साधू लागले. वाकड्या नजरेने तिच्याकडे पाहिले जात होते. एकदा त्यांच्याकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नदेखील झाल्याचे पीडितेने तक्रार म्हटले आहे. हा सर्व त्रास असह्य झालेल्या विवाहितेने अखेर बुधवारी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. गुन्हा दाखल करून पती, सासरा व दिरास अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत संवेदनशीलतेने करण्यात येत आहे.
- आसाराम चोरमले,
पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा
अनैतिक संबंध लपवून तरुणीची फसवणूक
आरोपी नागपूर येथील रहिवासी
पतीसह कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लग्नापूर्वीचे अनैतिक संबंध लपवून एका तरुणाने लग्न केले. आपला विश्वासघात झाल्याचे कळताच तरुणीने फे्रजरपुरा पोलिसांत नागपूर येथील रहिवासी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार देण्यात आली. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रानुसार, राहुल रेवकनाथ साळवे (३३), रेवकनाथ साळवे (७०), प्रभाकर सोनारे (६०), महेंद्र सोनारे (५५) व अमित पाटील (४५, सर्व रा. झिंगाबाई टाकडी, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील प्रशांतनगरातील रहिवासी एका तरुणीचे राहुल साळवे याच्याशी लग्न ठरले. तरुणीच्या कुटुंबीयांना लग्नाचा सर्व खर्च करून वसंत हॉल येथे धूमधडाक्यात लग्न लावले. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी राहुलने मुलीकडे सहा लाख रुपये व ५२ ग्र्रॅम सोन्याचे दागिने मागितले. माहेरच्यांनी पैसे व दागिने दिले. ती तरुणी लग्न होऊन सासरी नागपूर येथे राहायला गेली. १९ मे ते २४ मे २०१७ दरम्यान ती तरुणी पतीसोबत राहिली. मात्र, पती जवळ येत नसल्याचे त्या तरुणीच्या लक्षात आले. तरीसुद्धा ती काही दिवस पतीच्या घरीच थांबली.
दरम्यान, एकदा त्या तरुणीचे वडील मुलीला भेटायला नागपूर गेले. त्यावेळी मुलीला पतीने दोन दिवसांपासून जेवण दिले नसल्याचे कळले तसेच त्याचे पूर्वीच लग्न झाले आहे व त्याला दोन मुलेसुद्धा असल्याचे माहिती पडले. नवरा एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून, त्यांना दोन अपत्ये असल्याचे पाहून आपला विश्वासघात झाल्याचे मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी मुलीसह अमरावती गाठून गुरुवारी फे्रजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४१९, ४०६, ४१७, ४६८, ४७१, सहकलम ३,४, हुंडा प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा नोंदविला.