कुसुमकोट येथे विनापरवाना रेतीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:21+5:302021-04-08T04:13:21+5:30

----------------- क्षुल्लक कारणावरून इसमाला मारहाण धारणी : क्षुल्लक कारणावरून ५५ वर्षीय इसमाच्या हातावर दगडाने मारून दुखापत केल्याची घटना तालुक्यातील ...

Unlicensed transport of sand at Kusumkot | कुसुमकोट येथे विनापरवाना रेतीची वाहतूक

कुसुमकोट येथे विनापरवाना रेतीची वाहतूक

-----------------

क्षुल्लक कारणावरून इसमाला मारहाण

धारणी : क्षुल्लक कारणावरून ५५ वर्षीय इसमाच्या हातावर दगडाने मारून दुखापत केल्याची घटना तालुक्यातील गडगा भांडूम येथे ४ एप्रिल रोजी घडली. हरिचंद्र रामचंद्र सावलकर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी भुऱ्या राजू जावरकर (रा. गडगा मांडूम) विरुद्ध भादंविचे कलम ३३७, ५०४, ५०६ अन्वये ५ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविला.

-----------------------

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा छळ

मोर्शी : सात महिन्यांच्या गर्भवतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासू छळ करीत असल्याची तक्रार २३ वर्षीय महिलेने मोर्शी पोलिसांत दिली. पोलिसांनी सचिव सुरेश बंड (३४) व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------------

ट्रकवरील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

अंजनगाव सुर्जी : मो. समीर शे. अज्जू (रा. काळमेघ प्लाॅट) हा केळीचे बेणे भरण्यास जळगाव येथे ट्रक (एमएच २७ बी एक्स ६५५५) ने जात असताना, अचानक ब्रेक दाबल्याने रस्त्यावर कोसळला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मो. नाजीम अ. नशीर (२१) याच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रफीकउद्दीन अजिमोद्दीन (रा. पथ्रोट) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------

दारूची बॉटल डोक्यावर मारली

चांदूर बाजार : बहिणीबद्दल वाईट बोलल्याने हटकले असता, आरोपीने खिशातील दारूची बॉटल फिर्यादीच्या डोक्यावर फोडल्याची घटना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दरम्यान माळीपुरा येथे घडली. महेश दिनेश मांडळे (३३) यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी गिरीश गोपाळराव खोडेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

पत्नीचा पैशासाठी शारीरिक, मानसिक छळ

अचलपूर : विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याकरिता मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला. क्षुल्लक कारणावरून भांडण करून विवाहितेला माहेरी आणून सोडले तसेच सासूचाही त्रास वाढल्याची तक्रार १९ वर्षीय महिलेने सरमसपुरा पोलिसांत केली. त्यावरून पोलिसांनी मंगेश रमेश झोंबाडे, बेबी रमेश झोंबाडे (रा. अब्बासपुरा, अचलपूर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------

Web Title: Unlicensed transport of sand at Kusumkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.