अमरावती : बडनेरा ठाणे हद्दीतील उत्तमसरा येथे पोलिसांनी गुरुवारी १०२० रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपी सागर अशोकराव सुखदेवे (२४, रा. उत्तमसरा ता. भातकुली) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------------------------------
सार्वजनिक ठिकाणी पान विक्री
अमरावती : सार्वजनिक ठिकाणी हातगाडीवर पानविक्री करून इतर वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई हर्षराज कॉलनी चौकात गुरुवारी करण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------------------
शिवीगाळ करून मारण्याची धमकी
अमरावती : हॉटेलमध्ये पार्सल घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना खुशीबारवर गुरुवारी घडली. चिराग नरेंद्र बगडाई असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मनोज काळरामजी काळमेघ (३६, रा. हर्षराज कॉलनी) याने तक्रार नोंदविली.
----------------------------------------------------
वृद्धाला काठीने मारहाण
अमरावती : क्षुल्लक कारणावरून भांडण करून एका वृद्धाच्या डोक्यावर काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना वलगाव ठाणे हद्दीतील रेवसा येथे गुरुवारी घडली. आरोपी विनोद विलास भालचक्र(४५), चेतन भाष्कर मोहोड(२९, दोन्ही रा. रेवसा) विरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी विजय गणपतराव खडसे (६०, रा. रेवसा) यांनी तक्रार नोंदविली.