विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २९ मे रोजी ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST2021-05-13T04:13:06+5:302021-05-13T04:13:06+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन होणार आहे. ...

University's 37th Convocation Ceremony online on May 29 | विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २९ मे रोजी ऑनलाइन

विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २९ मे रोजी ऑनलाइन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन होणार आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात दीक्षांत समारंभाची तयारी आरंभली आहे.

दीक्षांत समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी, तर केंद्रीय भूपृष्ठ दळणवळणमंत्री नितीन गडकरी हे विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत राहतील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीक्षांत समारंभ ऑनलाइन घेण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने ७ मे रोजी घेतला आहे. दीक्षांत समारंभ ऑनलाइनसाठी विद्यापीठाकडून लिंक दिली जाणार आहे. मान्यवरांसह कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक, अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट सदस्य, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी आदी ऑनलाइन राहतील, अशी माहिती आहे. विद्यापीठातून २७१ आचार्य पदवीधारकांना पदवी वितरण केली जाणार आहे. अन्य शाखेच्या पदवी महाविद्यालयातून देण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------------

विद्यापीठातून असे होईल आचार्य पदवी वितरण

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा- १२६

मानव विज्ञान विद्याशाखा- ८७

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा- १९

आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा- ५२

-----------

कोट

व्यवस्थापन परिषदेत झालेल्या निर्णयानुसार दीक्षांत समारंभाच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. पाहुण्यांची तारीख, वेळ ठरली आहे. ऑनलाइन समारंभ असल्याने स्वतंत्र लिंक दिली जाणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ ऑनलाइन होऊ घातला आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

Web Title: University's 37th Convocation Ceremony online on May 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.