विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २१ फेब्रुवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:53+5:302021-01-23T04:12:53+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक ...

विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २१ फेब्रुवारीला
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत सोहळ्याला हजर राहतील, तसा होकारही त्यांनी दिला आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्यापही सोहळ्याला हजर राहण्याबाबत अधिकृत कळविले नाही, अशी माहिती आहे.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी दीक्षांत सोहळ्याच्या अनुषंगाने गुरुवारी काही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. दीक्षांत सोहळा ऑनलाईन की, ऑफलाईन हे तूर्तास निश्चित नाही. मात्र, शासन निर्देशाप्रमाणे दीक्षांत सोहळ्याचे आयोजन केले जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आचार्य पदवी, पदके, पदवी, गुणवत्ताधारक विद्यार्थी, सुवर्ण पदके आदी विभागनिहाय आढावा घेण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविले आहे. तूर्त राज्यपालांकडून यासंदर्भात निरोप आला नाही. सोमवार, २५ जानेवारीपर्यंत राज्यपालांचे ‘कन्सेंट’ येईल, असे कुलगुरुंनी बैठकीत सांगितले. दरम्यान कुलगुरू मुरलीधर चांदेकर, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी शुक्रवारी नागपूर येथे ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत पत्र दिले आहे. ना. गडकरी यांनीसुद्धा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला हजर राहण्याबाबत संमती दर्शविली आहे. केवळ राज्यपाल कोश्यारी यांची संमती येणे बाकी आहे. दीक्षांत सोहळ्याची उर्वरित तयारी प्रशासनाने जोरदारपणे चालविल्याचे चित्र आहे.