शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठ म्हणते नापास! एम.एस्सी. विद्यार्थिनीपुढे वर्ष वाया जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:07 IST

परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थिनीला बी.एस्सी.च्या अंतिम परीक्षेत नापास असल्याचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पाठविले आहे.

- गणेश वासनिक अमरावती -  बीएस्सी उत्तीर्ण झाल्याची विद्यापीठातून गुणपत्रिका मिळाली. त्याच्या आधारे एम.एस्सी. भाग-१ मध्ये प्रवेश घेतला. दिवसरात्र अभ्यास केला. आता परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थिनीला बी.एस्सी.च्या अंतिम परीक्षेत नापास असल्याचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पाठविले आहे. या अजब कारभारामुळे तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. दरम्यान, एम.एस्सी. अभ्यासक्रमाला प्रवेशित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तिचा प्रवेश रद्द करण्यास नकार देऊन तिला दिलासा दिला आहे.श्रुती पुंडलिक कडू असे सदर विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ च्या उन्हाळी परीक्षेत बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षाच्या पेपरपैकी दोन 'बॅक' राहिले होते. श्रुतीने ते पुनर्मूल्यांकनाला टाकले असता, संगणकाच्या पेपरला २० ऐवजी २६ गुण मिळाले. त्यामुळे रसायनशास्त्राच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन रद्द करावे आणि मूळ गुण कायम ठेवून उत्तीर्ण गुणपत्रिका देण्यात यावी, असा अर्ज गोपनीय विभागात सादर केला होता. परंतु, या अर्जावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट विद्यापीठाने ३० आॅगस्ट २०१८ रोजी चार गुणांची वाढ देत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका दिली. यानंतर एम.एस्सी. (संगणक विज्ञान) प्रथम वर्षाला तिने स्थानिक ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रथम सेमिस्टरसुद्धा दिले. दरम्यान, विद्यापीठाने आता तांत्रिक अडचण पुढे करून तिला बी.एस्सी. अनुत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका घेऊन जावी, असे पत्राद्वारे कळविले आहे. रसायनशास्त्र पेपरच्या पुनर्मूल्यांकनात गुण कमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकारामुळे श्रुतीपुढे पेच निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी ५० हजार रुपये खर्च झाले. एम.एस्सी.चे पहिले सत्र आटोपले. दुसºया सत्राची परीक्षा अवघ्या काही दिवसांत आहे. अशात तिचा प्रवेश रद्द झाल्यास, आर्थिक आणि शैक्षणिक वर्षाचे नुकसानास तिला सामोरे जावे लागणार आहे. 

पुनर्मूल्यांकनात दोन विषय होते. त्यापैकी एका विषयात ती उत्तीर्ण झाली होती. एक विषय तसाच राहिला होता. काही तांत्रिक चुकीमुळे श्रुती कडू हिला उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. आता हा विषय परीक्षा व मूल्यांकन मंडळापुढे निर्णयार्थ ठेवला जाईल. - राजेश जयपूरकर,     प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

बीएस्सी उत्तीर्ण गुणपत्रिकेच्या आधारेच श्रुती कडू हिला एम.एस्सी. प्रथम वर्षाला प्रवेश दिला. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने श्रृतीचा प्रवेश रद्द करण्याबाबत कळविले. मात्र, प्रवेश रद्द करता येणार नाही, असे विद्यापीठाला आम्ही कळविले आहे. श्रुतीचा एम.एस्सी. परीक्षा अर्ज विद्यापीठाने स्वीकारला नाही. - एन.सी. बेलसरे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र