विद्यापीठातर्फे मतदार जागृतीसाठी रथयात्रेचा शुभारंभ
By Admin | Updated: January 11, 2017 00:17 IST2017-01-11T00:17:03+5:302017-01-11T00:17:03+5:30
सदृढ लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जास्तीत-जास्त नागरिकांनी वापरावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी,

विद्यापीठातर्फे मतदार जागृतीसाठी रथयात्रेचा शुभारंभ
प्रचार-प्रसार : राज्य निवडणूक आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडी
अमरावती : सदृढ लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जास्तीत-जास्त नागरिकांनी वापरावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासनातर्फे राबविल्या जात असलेले मतदार जागृती अभियान, कॅशलेस सोसायटी निर्माणासाठी वित्तीय साक्षरता अभियान, स्वच्छ भारत अभियानाचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. त्यासाठी रथयात्रा काढून गावो-गावी प्रसार व प्रचार केला जाणार आहे. रथ यात्रेच्या रॅलीला शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून नुकतेच राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात करण्यात आला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाडगेबाबांच्या घोषणेसह रा.से.यो. स्वयंसेवकांनी मतदार जनजागृतीचे नारे दिले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गीते, कुलसचिव अजय देशमुख, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, रा.से.यो. समन्वयक गणेश मालटे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चवरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मतदार जनजागृती अभियानांतर्गत जागरूक मतदार सशक्त लोकशाही, युवा मतदार लोकशाहीचा आधार, मतदान करू देश घडवू, मतदानाद्वारे कर्तव्य, मतदार राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो, लोकशाहीचा राजा मी वाढवीण देशाचा मान, मी या स्लोगनद्वारे मतदार जागृती तसेच कॅशलेस व्यवहारासाठी वित्तीय साक्षरता अभियान व आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व विशद करणारे स्वच्छ भारत अभियान आदी स्लोगनद्वारे माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.
दारापूर येथील डॉ.कमलताई इन्स्टिटज्ूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने रथाचे प्रायोजक्तत्व स्वीकारले असून संचालक विद्यार्थी कल्याण गणेश मालटे यांच्यासह रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व क्षेत्रीय समन्वयक संतोष यावले व रा.से.यो. विद्यार्थी जनजागृती कार्यात प्रयत्नशील आहेत.