विद्यापीठ खरेदी करणार ४० लाख उत्तरपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:57+5:302021-04-10T04:12:57+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० नियमित आणि उन्हाळी २०२१ परीक्षेच्या अनुषंगाने ४० लाख उत्तरपत्रिका खरेदीसाठी निविदा ...

विद्यापीठ खरेदी करणार ४० लाख उत्तरपत्रिका
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० नियमित आणि उन्हाळी २०२१ परीक्षेच्या अनुषंगाने ४० लाख उत्तरपत्रिका खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता संबंधित एजन्सीसोबत करारनामा केल्यानंतर उत्तरपत्रिका मागविल्या जातील. उत्तरपत्रिका खरेदीसाठी व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान केली आहे.
नोडला येथील ग्रॉप्सन्स या एजन्सीकडे उत्तरपत्रिका पुरवठा करण्याचा कंत्राट ई-निविदाप्रक्रियेअंती सोपविण्यात आला आहे. यात २४ पानी उत्तरपत्रिका २० लाख, ८ पानी उत्तरपत्रिका १० लाख पुरवणी परीक्षेसाठी तर, ८ पानी १० लाख उत्तरपत्रिका प्रात्यक्षिक परीक्षांसाठी खरेदी करण्यात येणार आहे. २४ पानी उत्तरपत्रिका २ रूपये ७९ पैसे आणि ८ पानी उत्तरपत्रिका १ रुपया ८ पैसे दराने खरेदी करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका दर्जा विविध यंत्रणांकडून तपासणी केल्यानंतरच सदर एजन्सीला देयके दिले जातील, असा करारनामा करण्यात येणार आहे.
-------------------
निविदाप्रक्रियेअंती उत्तरपत्रिकांची खरेदी केली जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेने करारनामा करण्यास मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांत उत्तरपत्रिकांचा पुरवठा करण्यात येईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.