विद्यापीठ, महावितरणमध्ये बायोमेट्रिक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:43+5:30

सद्यस्थितीत कोरोना विषाणू चीनबाहेर पसरला आहे. त्यामुळे गंभीर परिणाम तसेच जीवितहानी होत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असून, या विषाणूमुळे बाधित झालेले रुग्ण देशात काही ठिकाणी आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महावितरणचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक बाब विचारात घेता, कोरोना विषाणूचा प्रसार कार्यालयात होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

University, Biometric closure in Mahavidyar | विद्यापीठ, महावितरणमध्ये बायोमेट्रिक बंद

विद्यापीठ, महावितरणमध्ये बायोमेट्रिक बंद

ठळक मुद्दे‘कोरोना’चा परिणाम : पुढील आदेशापर्यंत हजेरीपटावर नोंदणी

गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महावितरणने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची बायोमेट्रिक प्रणाली स्थगित केली आहे. त्याअनुषंगाने आदेश निर्गमित केले असून, पुढील आदेशापर्यंत हजेरीपटावर स्वाक्षरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीत कोरोना विषाणू चीनबाहेर पसरला आहे. त्यामुळे गंभीर परिणाम तसेच जीवितहानी होत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असून, या विषाणूमुळे बाधित झालेले रुग्ण देशात काही ठिकाणी आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महावितरणचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक बाब विचारात घेता, कोरोना विषाणूचा प्रसार कार्यालयात होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. विद्यापीठात ९ मार्चपासून बायोमेट्रिक बंद करण्यात आले. महावितरणने बायोमेट्रिक हजेरी ६ मार्चपासून बंद करावी, असे मुख्य महाव्यवस्थापन कमांडर शिवाजी इंदलकर यांनी परित्रपकाद्वारे कळविले.

विद्यापीठात ३७५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ३७५ अधिकारी, कर्मचारी आहेत. प्रत्येक विभागात बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. त्याशिवाय वेतन मिळत नाही. मात्र, कोरोना संसर्गामुळे काही दिवस बायोमेट्रिकचा ताण दूर होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव प्रवीण राठोड यांना बायोमेट्रिक प्रणाली तात्पुरती स्थगित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोना संसर्गापासून उपाययोजना म्हणून बायोमेट्रिक प्रणाली काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. पुढील आदेशानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकने सुरू केली जाणार आहे.
- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

Web Title: University, Biometric closure in Mahavidyar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.