भिल्लीचे ‘लोकबीज’ विद्यापीठ देणार बियाणे
By Admin | Updated: June 8, 2015 00:30 IST2015-06-08T00:30:36+5:302015-06-08T00:30:36+5:30
तालुक्यातील भिल्ली येथे शेतकऱ्यांना यंदा लोकबीज विद्यापीठातून देशी बियाणे उपलब्ध होणार आहे़

भिल्लीचे ‘लोकबीज’ विद्यापीठ देणार बियाणे
१०० एकरमध्ये बियाण्यांची पेरणी : सेंद्रिय शेतीमुळे देशभरात प्रसिध्दी
मोहन राऊ त अमरावती
तालुक्यातील भिल्ली येथे शेतकऱ्यांना यंदा लोकबीज विद्यापीठातून देशी बियाणे उपलब्ध होणार आहे़
दीड हजार लोकसंख्येच्या भिल्ली या गावात मागील १६ वर्षांपासून कृषिसंत म्हणून ओळखले जाणारे रमेश साखरकर देशी बियाणे व नवधान्य अभियान राबवीत आहेत. त्यांच्याकडे तब्बल दोनशे प्रकारच्या देशी बियाण्यांचा संग्रह असून त्यांनी गावात आदर्श बीजग्राम तयार केले आहे़ डाळ, कडधान्य, वेल, भाजीपाला, मसाला, कंद, फळ, चारा अशा वर्गीय बियाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे़ नवधान्य म्हणून मूग, तूर, उडीद, तीळ, मटकी, वाळूक, चवळी, भेंडी, ज्वारी, कापूस अशा देशी बियाण्यांची जपणूक रमेश साखरकर यांनी केली आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देशी बियाणे देऊन या शेतकरी अभियानात सहभागी होऊन खरीप व रबी हंगामात सेंद्रिय शेतीत देशी बियाण्यांची लागवड करतात़
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा देशी बियाण्यांकडे वाढता कल पाहता भिल्ली येथे लोकबीज विद्यापीठाची स्थापना करण्यात आलीयासाठी दहा शेतकऱ्यांचा कोअर ग्रुप तयार करण्यात आला आहे़ दोन ते अडीच एकर जमिनीत देशी बियाण्यांची लागवड करण्यात आली. यातून देशी बियाणे निर्माण करण्यात आले़ शेतकऱ्यांचे स्वत:चे शेत हे विद्यापीठाचे शेत म्हणून संबोधले गेले होते़ जो शेतकरी मातीच्या कणाशी, पाण्याच्या थेंबाशी, बियाण्यांच्या दाण्याशी बोलणारा असेल तो या लोकबीज विद्यापीठाचा़ प्राध्यापक अशी पदवी देण्यात आली होती़
तालुक्यातील उसळगव्हाण येथील रावसाहेब दगडकर, बोरवघड येथील राजू मोहोड, तळेगाव दशासर येथील विजय चौधरी, कावलीचे माधव इंगळे, विजय निवल हे शेतकरी सेंद्रीय खतावर उत्पन्न घेत असत आज या शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत तालुक्यातील ३०० शेतकरी सेन्द्रीय शेतीतून उत्पन्न काढत आहे़
लोकबीज विद्यापीठाचा लाभ इतर शेतकऱ्यांना झाला आहे़ आता पुढील हंगामात शेतकऱ्यांना हे देशी बियाणे मोठ्या प्रमाणात तयार करून दिले जाईल.
- रमेश साखरकर,
भिल्ली, धामणगाव रेल्वे.