शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न
By Admin | Updated: February 22, 2015 00:07 IST2015-02-22T00:07:08+5:302015-02-22T00:07:08+5:30
जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न
अमरावती : जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शिक्षण समन्वयक समितीची पहिली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीत शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी सर्व शिक्षा अभियान, आणि शिक्षण विभागाशी संबंधित विविध उपक्राची माहीती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सर्व शिक्षा अभियानाची माहिती बैठकीत दिली. बैठकीच्या प्रारंभीच पालकमंत्री प्रविण पोटे यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चिखलदरा, धारणी भागात शिक्षणासह आरोग्य, वीज आदि महत्वाचे प्रश्न आहेत.याशिवाय जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्याना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. उर्दु, इंग्रजी, मराठी शाळांचा विषय महत्वाचा आहे. जिथे शिक्षक नाहीत तिथे कंत्राटी शिक्षक द्यायला पाहिजे. सीबीएससी पॅटर्न च्या शाळांत कोणते शिक्षक घ्यावयाचे यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ज्या प्रमाणात या संस्था पालकांकडुन शुल्क आकारता त्या प्रमाणात पाल्यांना शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या पाहिजेत.
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्याची गरज आहे असे सांगुन पोटे म्हणाले मेळघाट परिसरात चांगले शिक्षण देण्यासाठी शासनांच्या नियमांचे पालन करावे. शिक्षणाचा स्तर वाढेल, डिपीडीसी निधीमधुन शाळांना डेस्क, बेंच चांगले पुरविण्याबाबत तसेच शाळांची दुरुस्तीबाबत यावेळी चर्चा झाली. येणा?्या काळाता इमारतीमुळे किंवा शिक्षकांमुळे अडचण आली, असे प्रकार यापुढे होणार नाही. ई-लर्निंग संकल्पना चांगली आहे. त्याप्रमाणात शिक्षकांनी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. प्रत्येक शाळेत खेळण्याची सोय असणे आवश्यक आहे.यावेळी आमदार अनिल बोंडे, यशोमती ठाकुर, विरेंद्र जगताप, रमेश बुंदिले, श्रीकांत देशपांडे यांनी उपायुक्त सुचना केल्या.
यामध्ये आमदार अनिल बोंडे, यांनी उर्दु शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षकांचे रखडलेले समायोजन असे विविध मुद्दे मांडून कारवाई करण्याची सुचना केली.तिवसा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधेसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही त्याची दखल शिक्षण विभागाने घेतली नाही.
याबद्दल आमदार यशोमती ठाकुर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ईतही प्रश्नाकडे लक्ष वेधले. आमदार विरेंद्र जगताप यांनी जिल्हयातील सि बी एस ई पॅटर्न च्या शाळाची माहिती आणि मान्यता नसलेल्या शाळावर काय कारवाई केली यासह विविध शिक्षणासंबधी माहिती लोकप्रनिधीना देण्यात यावी , समायोजनाची व रिक्त पदावर शिषकांची नियुक्ती करावी अशा सुचना केल्या तर आमदार रमेश बुंदिले यांनीही मतदार संघातील तसेच शिक्षण विभागाने शाळ) वर्ग खोल्याची दुरूस्ती , संरक्षण भिंती बांधण्याची सुचचना केली .बैठकीला
आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, उपाध्यक्ष सतिश हाडोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अनिल भंडारी, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे,सि आर राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे एन आभाळे, पी जी भागवत, नगरपरिषद अध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य विभागप्रमुख, विषय समितींचे सभापती, नगराध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)