शेतकरीपुत्रांचा अनोखा गौरव सोहळा
By Admin | Updated: May 23, 2016 00:18 IST2016-05-23T00:18:50+5:302016-05-23T00:18:50+5:30
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त २१ मे रोजी वलगाव येथे विदर्भस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

शेतकरीपुत्रांचा अनोखा गौरव सोहळा
राजीव गांधी स्मृती दिन : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपक्रम, विदर्भ कृषिरत्न पुरस्कार वितरित
अमरावती : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त २१ मे रोजी वलगाव येथे विदर्भस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून हिंगोलीचे खासदार व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव सातव प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय आ. वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, संजय खोडके, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, माजी आमदार सुलभा खोडके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण, नितीन कुंभलकर, निवड समितीच्या सदस्य पूर्णिमा सवाई, किशोर चांगोले, बाळासाहेब वानखडे, जावेद खान, प्रदीप जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी विदर्भातील प्रगतिशील एकूण १४ शेतकरी व दोन कृषी वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश साबळे संचालन अभिजित देवके यांनी केले. याप्रसंगी आयोेजन समितीचे ऐनाउल्ला खान, पंकज देशमुख, शशीकांत बोंडे, राहुल तायडे, सुनील भगत, समीर जंजाळ, अनिकेत ढेंगळे, अनिकेत जावरकर, नितीन कटकतलवारे, गोपाल महल्ले, उमेश वाकोडे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. उद्धव नेरकर, धीरज बाहेकर, दिलीप अलोणे, विठ्ठल माळी, विवेक चर्जन, माणिकराव कदम, विजय धोंडगे, शिवाजी देशमुख, नम्रता पारोदे, गंगाबाई जावरकर, अमर तायडे, प्रशांत धरपाळ, गणेश ठाकरे, रामभाऊ मेश्राम, राजू चौधरी यांना गौरव करण्यात आले.