केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अपंगांना साधनांचे वाटप

By Admin | Updated: February 11, 2016 00:37 IST2016-02-11T00:37:49+5:302016-02-11T00:37:49+5:30

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व अ‍ॅलिम्को भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम जबलपूर यांच्या विद्यमाने २३ जानेवारी २०१५ रोजी ...

Union ministers distributed medicines to disabled people | केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अपंगांना साधनांचे वाटप

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अपंगांना साधनांचे वाटप

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांची माहिती
अमरावती : जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व अ‍ॅलिम्को भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम जबलपूर यांच्या विद्यमाने २३ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या महाशिबिरात अ‍ॅलिम्कोच्या तज्ज्ञ वैद्यकीय चमूने निवड केलेल्या अपंगांना शारीरिक क्षमतेनुसार उपयुक्त साधनांचे वाटप १४ फेब्रुवारीला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांचे हस्ते वितरित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय सचिव अविनाश अवस्थी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, महापौर रिना नंदा, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, सीईओ सुनील पाटील उपस्थित राहणार आहेत. अपंगांना तीन चाकी सायकल, व्हील चेअर, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रिम हात-पाय, बुट, अंध बांधवांना काठ्या, मतिमंदासाठी आवश्यक किट व कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र आदी साधने मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राद्वारा स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन देखील याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संचालक किशोर बोरकर यांनी यावेळी दिली. यामुळे अपंगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चिखलदऱ्यात सिडकोचा ५०० कोटींचा प्रकल्प
चिखलदऱ्यात सिडकोचा ५०० कोटीचा प्रकल्प साकारणार आहे. यासाठी ई क्लास जागा देण्यात आली. तेथील हॉटेल असोसिएशनचे पुनर्गठन करून येथे आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येणार आहे. हरिसाल डिजीटल व्हिलेजसाठी मॉयक्रोसॉफ्टची टीम येणार असून तेथे एटीएम सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Union ministers distributed medicines to disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.