वनमजूर सर्रास वावरताहेत शासकीय गणवेशात

By Admin | Updated: July 19, 2014 23:41 IST2014-07-19T23:41:26+5:302014-07-19T23:41:26+5:30

वनमजुरांना शासन मुद्रा असलेला शासकीय खाकी गणवेश घालण्याचा अधिकार नसतानाही धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे वनमजूर हे शासन मुद्रा असलेले खाकी गणवेश धारण करून येथील वन

In the uniform of the government uniform | वनमजूर सर्रास वावरताहेत शासकीय गणवेशात

वनमजूर सर्रास वावरताहेत शासकीय गणवेशात

राजेश मालवीय - धारणी
वनमजुरांना शासन मुद्रा असलेला शासकीय खाकी गणवेश घालण्याचा अधिकार नसतानाही धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे वनमजूर हे शासन मुद्रा असलेले खाकी गणवेश धारण करून येथील वन तपासणी नाक्यासह शहरात वनाधिकाऱ्यांसारखे वावरत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाकडून वनमजुरांना मिल्ट्री सारखा दिसणारा शासकीय गणवेश घालण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र पश्चिम मेळघाट वन विभागात धारणी वनपरिक्षेत्रातील एकही वनमजूर मिल्ट्रीसारखा गणवेश घालत नाही. गेल्या काही महिन्यांपासून येथील कित्येक वनमजूर शासन मुद्रा व खिशावर राष्ट्रीय ध्वजाचे चिन्ह आणि कमरेच्या बेल्टवर शासन मुद्रा असलेले शासकीय खाकी गणवेश घालून येथील वन तपासणी नाक्यावर आणि शहरासह दस्तुरखुद्द त्यांच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयातही बिनधास्तपणे वावरत आहेत. वनरक्षक, वनपाल, वन अधिकारी यांच्यातील अंतर ओळखणे कठीण झाले आहे. काही वनमजूर तर शासकीय वाहनाने शहरासह तालुक्यातील आदिवासी खेड्यात जाऊन वन अधिकारी असल्याचा धाक दाखवून हैदोस घालत आहेत.
शहरात लाकडी मोळी विक्री करणाऱ्या गरीब आदिवासींनाही दमदाटी केली जात आहे. हा सर्व प्रकार वनपरिक्षेत्र कार्यालयातही दिसून येत असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे याकडे चक्क दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रकाराला वाव मिळत आहे.

Web Title: In the uniform of the government uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.