अज्ञात वाहनाने तोडला विजेचा खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST2021-03-06T04:12:32+5:302021-03-06T04:12:32+5:30

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी ते अकोट रस्त्यावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिली. यामुळे ...

An unidentified vehicle broke a power pole | अज्ञात वाहनाने तोडला विजेचा खांब

अज्ञात वाहनाने तोडला विजेचा खांब

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी ते अकोट रस्त्यावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिली. यामुळे तो विजेचा खांब रस्त्यावर तुटून पडला. मोठा धमाका झाला. वीज प्रवाह सुरू असल्याने रस्त्यावर पडलेल्या त्या तारांमधून आगीच्या ठिणग्या निघत होत्या. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास अंजनगाव सुर्जी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयापुढील रस्त्यावर हा अपघात घडला.

घटनास्थळासमोर पेट्रोल पंप असल्याने व त्या घटनेमुळे झालेल्या पळापळीने पेट्रोल पंपावरदेखील धावपळ झाली. वाहतूक काही काळासाठी थांबली. पोलीस उपनिरीक्षक इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली. मात्र, कंटेनरचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. महावितरणचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी खांब व वीज तार उचलून वीज प्रवाह सुरू केला.

Web Title: An unidentified vehicle broke a power pole