शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

अमरावती महापालिकेवर आलेल्या जप्तीची नामुष्की टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 11:27 AM

संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रशासनावर आलेली जप्तीची नामुष्की बुधवारी टळली.

ठळक मुद्देसंपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी केली टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रशासनावर आलेली जप्तीची नामुष्की बुधवारी टळली. सुमारे ३३ लाख रुपयांचा मोबदला घेण्यासाठी येथील यादव परिवारातील सदस्य बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेत आले. जप्ती वॉरंट घेऊन आलेले न्यायालयाचे बेलिफ पी.आर.राऊत हे त्यांच्यासमवेत होते. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्या रकमेचा धनादेश द्यावा, अशी भूमिका बेलिफ यांच्यासह यादव कुटुंबातील गीता यादव यांच्यासह अन्य सदस्यांनी घेतली. प्रशासनाच्यावतीने आयुक्त हेमंत पवार आणि विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्याकडून एक महिन्याची मुदत मागितली. यादव कुटुंबाने महिनाभर थांबण्याची भूमिका घेतल्याने पुढील पेचप्रसंग टळला.अकोली बायपास या रस्त्यासाठी सन २००४ मध्ये शासनाकडून भूस्ंपादन करण्यात आले होते. तो रस्ता सार्वजिनक बांधकाम विभागाचा असला तरी संपादित प्राधिकरण महापालिका होते. त्या पार्श्वभूमिवर वाढीव मोबदला मिळण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा चालविला असून, त्यासाठी एक महिन्याची मुदत आवश्यक असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केल्यानंतर महापालिकेवर आलेली जप्तीची नामुष्की टळली. येथील दुसरे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयाच्या आदेशानुसार उमाकांत बैजनाथ यादव यांचे कुटुंब ३३, २६, २४९ रुपयांचा मोबदला घेण्यासाठी महापालिकेत पोहोचले होते. न्यायालयाचे बेलिफ जंगम जप्ती वॉरंट घेऊन पोहोचल्याने महापालिकेत मोठी खळबळ माजली होती.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका