अचलपूरमध्ये अनपेक्षित निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:32+5:302021-01-19T04:16:32+5:30

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत. यात मतदारांनी जुन्यांना डावलून नव्यांना संधी ...

Unexpected result in Achalpur | अचलपूरमध्ये अनपेक्षित निकाल

अचलपूरमध्ये अनपेक्षित निकाल

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत. यात मतदारांनी जुन्यांना डावलून नव्यांना संधी दिली. मतदारांनी ‘नोटा’चाही वापर केला. काहींना शून्य मते मिळाली आहेत. तीन ग्रामपंचायतींमध्ये ईश्वरचिठ्ठी निघाली. नजीकच्या कांडली येथे सहा प्रभागांतून १७ सदस्यांपैकी ११ नवे चेहरे आहेत. सरपंचांसह त्यांच्या गटाला पराभवाला सामाेरे जावे लागले. पथ्रोट या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजप समर्थित पॅनलचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. मल्हारा ग्रामपंचायत राजकारणात मामा-भाच्यांच्या जाधव-बोरेकार गट रंगत आणत असतो. यंदा परिवर्तन वरचढ ठरले आहे. या परिवर्तनामुळे बोरेकारांना सत्ता मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. गौरखेडा कुंभीत तर पती पत्नी विजयी ठरलेत. त्यांची आत्यादेखील सदस्य झाली. तेजस्विनी अंकुश भिरकड, अंकुश शंकरराव भिरकड व कमला एकनाथ शिंदे अशी त्यांची नावे आहेत. दर्याबाद ग्रामपंचायत बिनविरोध ठरली. १७ ग्रामपंचायतींचे ५७ सदस्य मतदानापूर्वीच निवडले गेले. ३४० जागांकरिता ८६७ उमेदवार रिंगणात होते.

Web Title: Unexpected result in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.