बेरोजगारांची आर्थिक फसवणूक, आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST2021-07-31T04:13:47+5:302021-07-31T04:13:47+5:30
आरोपी संदीप व दिलीप जाधव यांची जुनी ओळख आहे. त्यातून महापालिका व पीडीएमसीत १५ जागा भरायच्या आहेत. त्या आपण ...

बेरोजगारांची आर्थिक फसवणूक, आरोपीला अटक
आरोपी संदीप व दिलीप जाधव यांची जुनी ओळख आहे. त्यातून महापालिका व पीडीएमसीत १५ जागा भरायच्या आहेत. त्या आपण ओळखीने भरू शकतो, असेही मोरेने सांगितले. त्यामुळे ५ ते ७ हजार प्रत्येकी अशा १४ मुलांकडून घेतलेले १ लाख ६० हजार रुपये जाधव यांनी मोरेला दिले. हा सर्व व्यवहार दोन महिन्यांपूर्वी झाला. मात्र, त्यानंतर आरोपीने नौकरीबाबत चकार शब्द काढला नाही. कोरोनाचे कारण समोर करण्यात आलेे. पैसे परत करण्यासही त्याने टाळाटाळ चालविल्याचे लक्षात आल्याने जाधव यांनी अखेर फ्रेजरपुरा पोलिसांकडे धाव घेतली. पीएसआय गजानन राजमुलू व पोलीस अंमलदार शेखर गायकवाड यांनी आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.