जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 00:10 IST2016-05-31T00:10:17+5:302016-05-31T00:10:17+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात मागच्या बाजूला बेशिस्त वाहने लावली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त पार्किंग
जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लावली जातात वाहने
संदीप मानकर अमरावती
जिल्हाधिकारी कार्यालयात मागच्या बाजूला बेशिस्त वाहने लावली जात आहे. जिलाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सर्व नियम ताब्यावर बसवून नो-पार्किंग झोन मध्ये वाहने लावत आहे. याकडे जिल्हाधिकारी, किरण गित्ते यांचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याच महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी लोकांची व अधिकाऱ्यांची वर्दळ असते. कार्यालयासमोरील परिसरातही नागरिक कुठेही वाहने ठेवतात. जर जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणीच नियम पाळले जात नसतील तर इतर कार्यालयाने या कार्यालयाचा आदर्श कसा घ्यावा, असा प्रश्न पडत आहे. येथील अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी राजोरोसापणे वाहने ठेवली होती. तसेच करमणूक शुल्क विभागाच्या बाहेर अस्तव्यस्त वाहने ठेवण्यात आली होती. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आहे. येथेसुद्धा बेशिस्त वाहने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवारात ठेवली होती. तसेच अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत वाहने ठेवला जात आहे. त्यामुळे येथे नियम पाळले जातात की, नाही असा प्रश्न अंबानगरीतील जनतेला पडला आहे. बाहेर नागरिकांनी नो पार्किंग झोन मध्ये व बेशिस्तपणे वाहने ठवले तर नागरिकांवर वाहतूक पोलिस कारवाई करतात. पण जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारीच बेशिस्तपणे कुठेही वाहने लावत असतील तर जिल्हाधिकारी किरण गित्ते कारवाईचा बडगा उभारणार का, असा प्रश्न जबाबदार नागरिकांना पडला आहे.
जिल्हाधिकारी लावणार का कर्मचाऱ्यांना शिस्त ?
राजोरोसपणे नियमांचे उल्लंघन करुन बेशिस्त वाहने ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी किरण गित्ते कारवाईचा बडगा उभारुन त्यांना शिस्त लावणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. या बेजाबदार कर्मचाऱ्यांचा आदर्श इतर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कसा घ्यावा, हा प्रश्न पडला आहे.