शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अखंड ज्योतींनी कोंडण्यपूर उजळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 18:55 IST

विदर्भातील भीमक राजाची नगरी रुख्मिणीचे माहेरघर कोंडण्यपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. रुख्मिनीची कुलस्वामिनी म्हणून भागवतात उल्लेख असलेली येथील अंबिका  देवी आहे. नवरात्रीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथे ११०१ घटांवरील ज्योती लावण्यात आल्या आहेत. 

अमरावती - विदर्भातील भीमक राजाची नगरी रुख्मिणीचे माहेरघर कोंडण्यपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. रुख्मिनीची कुलस्वामिनी म्हणून भागवतात उल्लेख असलेली येथील अंबिका  देवी आहे. नवरात्रीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथे ११०१ घटांवरील ज्योती लावण्यात आल्या आहेत. भीमक राजाच्या नगरीत हे मंदिर अतिशय पुरातन काळापासून आहे. याच मंदिरातून रुख्मिणीचे वासुदेव ब्राह्मणांच्या हातानी द्वारकेला पत्र पाठविले होते. ते श्रीकृष्णाच्या हाती गेल्यावर श्रीकृष्ण ताबडतोब रथमार्गे कोंडण्यपुरात दाखल झाला. रुख्मिणीला लग्नाची हळद लागली असताना प्रथेनुसार अंबिकेचे दर्शन घेण्यास ती येथे आली आणि त्यावेळी श्रीकृष्णाने याच मंदिरातून अंबिकेच्या साक्षीने रुख्मिणीचे हरण केले. देवीवर रुख्मिणीची असीम भक्ती असल्यामुळे नवरात्रीत येथे दिवसातून चार वेळा आरती केल्या जाते. अंबिकेच्या संकल्पासाठी येथे २४ तास नऊ दिवस अखंड ज्योती लावण्यात आल्यात. नवमीला हजारो भाविक ज्योती विसर्जनासाठी वर्धा नदीच्या घाटावर जातात. दरवर्षी येथे दोन नवरात्र असतात. अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्र. त्यावेळीपण अशीच गर्दी येथे राहते. हे मंदिर अतिशय पुरातन असून अंबिकेची सुंदर मूर्ती आह येथील उत्खननात बºयाच पुरातन दस्तावेज मिळाले असून सरकारच्या पुरातन विभागात व भागवतात याचा उल्लेख आहे, अशी माहिती येथील मंदिराचे व्यवस्थापक भैयासाहेब ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७Navratriनवरात्री