वाहतूक शाखेत भरली विनापरवानाधारकांची शाळा
By Admin | Updated: July 28, 2015 00:22 IST2015-07-28T00:22:32+5:302015-07-28T00:22:32+5:30
पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी शहरात वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे.

वाहतूक शाखेत भरली विनापरवानाधारकांची शाळा
सोमवारी ६१ कारवाया : विनापरवाना, अल्पवयीन वाहनधारक ‘टार्गेट’
अमरावती : पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी शहरात वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. तीन दिवसांत अनेक विनापरवाना व अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई केली आहे. सोमवारी तीनही वाहतूक शाखांनी तब्बल ६१ वाहनधारकांवर कारवाई करून २१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरात वाहनांची वाढती संख्या अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे. त्यातच विनापरवाना व अल्पवयीन वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त व्हटकर यांनी विशेष मोहीम राबविली आहे. शहरातील तीनही वाहतूक शाखांनी सोमवारी ही मोहीम युध्दस्तरावर राबविली. फिक्स पॉर्इंट लाऊन विनापरवाना वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलीे. त्यामध्ये राजापेठ विभागात ४६ वाहनाधारकांवर कारवाई करून ११ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. गाडगेनगर परिसरात १८ वाहनधारकांवर कारवाई करून ८ हजारांचा दंड तर फे्रजरपुरामध्ये ७ वाहनधारकांकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल केला.