शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

विनापरवाना औषधींची साठवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:53 PM

विनापरवाना औषधसाठा गोळा करून ठेवणाऱ्या वरूड येथील भवानी मेडिकल अँड सर्र्जिकल्सचे संचालक सांरग नारायण चौधरी यांच्या घरावर सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. त्यांच्या घरातून तब्बल २ लाख ४४ हजार १४५ रुपयांचा अ‍ॅलोपॅथिक औषधसाठा एफडीएने जप्त केला आहे. या घटनेमुळे वरुड येथील औषध व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएफडीएची वरुडमध्ये धाड : अडीच लाखांचा साठा जप्त

अमरावती : विनापरवाना औषधसाठा गोळा करून ठेवणाऱ्या वरूड येथील भवानी मेडिकल अँड सर्र्जिकल्सचे संचालक सांरग नारायण चौधरी यांच्या घरावर सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. त्यांच्या घरातून तब्बल २ लाख ४४ हजार १४५ रुपयांचा अ‍ॅलोपॅथिक औषधसाठा एफडीएने जप्त केला आहे. या घटनेमुळे वरुड येथील औषध व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.एफडीए सूत्रानुसार, सारंग चौधरी (रा. भवानी मंदिराजवळ) यांचे वरुड येथील इंदिरा चौकात भवानी मेडिकल अ‍ॅन्ड सर्जिकल्स नामक औषधविक्रीचे प्रतिष्ठान होते. याशिवाय ते ग्रामीण भागात हॉस्पिटलला औषधी पुरवठा करीत होते. एकाच परवान्यावर दोन कामे करीत असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या निदर्शनास आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. त्यांनी तो परवाना एफडीएकडे जमा केला. शिल्लक औषधसाठा चौधरी यांनी एफडीएच्या परवानगीने संबधितांकडे परत पाठवायला हवा होता. मात्र, त्यांनी तसे न करता तो घरात गोळा करून ठेवला. हा प्रकार एफडीएच्या निदर्शनास आल्यानंतर सोमवारी औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सी.के. डांगे यांच्या मार्गदर्शनात औषधी निरीक्षक उमेश घरोटे व मनीष गोतमारे यांनी सारंग चौधरी यांच्या वरूड येथील प्रतिष्ठानावर धाड टाकली. त्यांच्या घरातून औषधी जप्त केल्या. याप्रकरणी एफडीएने सारंग चौधरीविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या कलम १८(क) नुसार कारवाई केली आहे. एफडीए अधिकाऱ्यांनी औषधसाठ्यातील एक नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे.अ‍ॅलोपॅथिक औषध जप्तसारंग चौधरी यांच्या घरात अ‍ॅन्टीबॉयोटीक, विटामीन, वेगवेगळ्या क्रिम, कप्सुल, टॅबलेट, सायरप, ईअर ड्राप, आय ड्राप अशा प्रकारच्या विविध अ‍ॅलोपॅथिक औषधीचा साठा आढळून आला आहे. विना परवाना या औषधी विक्री करणे हे नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता असते, त्यामुळे एफडीएने तो साठा जप्त केला.आरोग्याशी खेळएफडीएचा परवाना नसतानाही औषधी विक्री केल्यास, असे कृत्य नागरिकांच्या आरोग्याला धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे विना परवाना औषधींची विक्री किंवा साठवणूक कोणी करीत असेल, त्याची माहिती एफडीएला कळवा, असे आवाहन सहायक आयुक्त सी.के.डांगे यांनी नागरिकांना केले आहे.