उमरपूर शिवारात बिबट्याने केली बोकडाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:44+5:302021-06-03T04:10:44+5:30

फोटो - चांदूर रेल्वे ०२ पी चांदूर रेल्वे : तालुक्यातील उमरपूर गावाजवळील शिवारात बिबट्याने बोकडाची शिकार केल्याची घटना ...

In Umarpur Shivara, a leopard hunted a goat | उमरपूर शिवारात बिबट्याने केली बोकडाची शिकार

उमरपूर शिवारात बिबट्याने केली बोकडाची शिकार

फोटो - चांदूर रेल्वे ०२ पी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील उमरपूर गावाजवळील शिवारात बिबट्याने बोकडाची शिकार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. बोकडमालकाने काठी हाणल्याने बिबट्याने बोकडाला सोडले. मात्र, प्राणांतिक जखमांमुळे त्याचा जीव गेला.

चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका जगताप गावाजवळ उमरपूर येथील दिलीप पोपटकर यांचा शेळीपालनचा व्यवसाय आहे. शनिवारी सायंकाळी त्च्या सुमारास गव्हा फरकाडे कॅनल परिसरातून शेळ्या चारून घरी परत येत असताना उमरपूर गावाजवळ बिबट्याने त्यांच्या कळपातील चार वर्षीय बोकडाला गाठून त्याच्यावर हल्ला चढविला. दिलीप पोपटकर यांनी जिवाची पर्वा न करता त्या बिबट्याला काठी हाणल्याने त्याने बोकडला सोडून पळ काढला. मात्र, बिबट्याने दात मानेत खोलवर खुपसले गेल्याने बोकडाचा मृत्यू झाला होता.

बिबट्याने यापूर्वी पोपटकर यांच्या दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. मात्र, त्याचा कोणताच पुरावा नसल्याने नुकसानभरपाई मिळाली नाही. यावेळीही त्यांचे नऊ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाने झालेल्या नुकसानाची भरपाई करून दयावी, अशी मागणी केली आहे. या भागातील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असून, त्याने अनेकांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. या हिंस्त्र पशूचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी उमरपूर ग्रामस्थांनी केली आहे. यादरम्यान वनकर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी उमरपूर गाठून पंचनामा केला.

===Photopath===

020621\img-20210602-wa0025.jpg

===Caption===

photo

Web Title: In Umarpur Shivara, a leopard hunted a goat