'त्या' बसचालकाचे अखेर निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:30 IST2018-09-10T23:30:25+5:302018-09-10T23:30:44+5:30
दर्यापूर आगारातील बसचालक एका पायाने बस चालवीत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने सोमवारच्या अंकातून लोकदरबारात मांडला होता. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार चालकाच्या कृत्याची गंभीर दखल घेत अमरावती राज्य परिवहन विभागीय प्रमुखांनी कठोर कारवाईचे आदेश दर्यापूर आगार नियंत्रकांना दिले. त्यानंतर बसचालक रमेश टापरे याला सेवेतून निलंबित केल्याची माहिती आगारप्रमुख जयकुमार इंगोले यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना दिली.

'त्या' बसचालकाचे अखेर निलंबन
अंजनगाव सुर्जी : दर्यापूर आगारातील बसचालक एका पायाने बस चालवीत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने सोमवारच्या अंकातून लोकदरबारात मांडला होता. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार चालकाच्या कृत्याची गंभीर दखल घेत अमरावती राज्य परिवहन विभागीय प्रमुखांनी कठोर कारवाईचे आदेश दर्यापूर आगार नियंत्रकांना दिले. त्यानंतर बसचालक रमेश टापरे याला सेवेतून निलंबित केल्याची माहिती आगारप्रमुख जयकुमार इंगोले यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना दिली.
८ सप्टेंबर रोजी राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक एम एच २० बीएल १९३१ दर्यापूर निंभारीमार्गे अंजनगाव सुर्जीसाठी निघाली असता, बसचालकाने शहरातून बस बाहेर निघताच एक पाय वर करून बस चालविली. तीत २० ते ३० प्रवाशी होते व विद्यार्थीदेखील होते.