टंकलेखन परीक्षा दोन फेब्रुवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:01+5:302021-02-05T05:26:01+5:30
जिल्ह्यात १० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी शहरात ४, तर ग्रामीण भागासाठी ६ केंद्र राहणार आहेत. प्रवेशपत्रे ...

टंकलेखन परीक्षा दोन फेब्रुवारीपासून
जिल्ह्यात १० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी शहरात ४, तर ग्रामीण भागासाठी ६ केंद्र राहणार आहेत. प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर संस्था लॉगीनव्दारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. टंकलेखन व लघुलेखन संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासोबत परीक्षा परिषदेने दिलेल्या नमुन्यातील स्वंयघोषणापत्र आणणे बंधनकारक आहे. ओळखपत्रात काही सुधारणा असल्यास अशा संबंधित संस्था चालकांनी विद्यार्थ्यांचा फोटो व ओळखपत्रासह समक्ष परीक्षा परिषदेच्या कार्यालयात येऊन प्रवेश पत्रावर प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिका घ्यावा त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. सर्व परीक्षार्थ्यांनी आपआपल्या टंकलेखन, लघुलेखन संस्थेतून आपले ओळखपत्र वेळी मिळवून घ्यावे. परीक्षा सुरू झाल्यानंतर त्यात दुरुस्ती केली जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
बॉक्स
असे आहे घोषणापत्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे स्वयंघोषणापत्राचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात उमेदवारांनी आपले नाव लिहून मी स्वेच्छेने ही परीक्षा देत आहे. मला कोरोनाची लागण झालेली नाही किंवा कोरोना सदृश लक्षणे नाहीत. मला कोरोनाची लागण झाल्यास त्यापोटी येणारा वैद्यकीय खर्च देण्यास परीक्षा परिषद बांधील नाही, अशी घोषणा पत्रातसुद्धा नमूद आहे.