टायफाईडचे १४२, डायरियाचे १२६ रुग्ण

By Admin | Updated: June 24, 2015 00:30 IST2015-06-24T00:30:16+5:302015-06-24T00:30:16+5:30

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.

Typhoid 142, diarrhea 126 patients | टायफाईडचे १४२, डायरियाचे १२६ रुग्ण

टायफाईडचे १४२, डायरियाचे १२६ रुग्ण

आजार वाढले : दोन आठवड्यांचा अहवाल
अमरावती : पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. इर्विनमध्ये दोन आठवड्यांत टायफाईडचे तब्बल १४२ तर, डायरियाचे १२६ रुग्ण दाखल झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे पाणी जमिनीत मुरल्यावर जलस्त्रोतांची जलपातळी वाढत आहे. पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरणामुळे निर्माण होईन ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. जिल्हाभरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भावसुध्दा वाढतो. त्यातच उघड्यावरील खाद्यान्नातूनही मोठ्या प्रमाणात आजार बळकावण्याची शक्यता सर्वाधिक असते.

पावसाळ्यात रोगराई वाढते. दूषित पाणी व उघड्यावरील अन्न पदार्थांमुळे डायरिया, सर्दी, खोकला, तायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे. तसेच उघड्यावरील खाद्यान्न खाणे टाळले पाहिजे.
- सुनीता मेश्राम,
वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Typhoid 142, diarrhea 126 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.