शहरात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST2021-04-15T04:12:41+5:302021-04-15T04:12:41+5:30
अमरावती : राजापेठ हद्दीतील विविध परिसरात दोन तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केली. रवि महादेव वानखडे (३२ रा. राजापेठ झोपडपट्टी) ...

शहरात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
अमरावती : राजापेठ हद्दीतील विविध परिसरात दोन तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केली. रवि महादेव वानखडे (३२ रा. राजापेठ झोपडपट्टी) आणि अमन शंकरप्रसाद पांडे (२० रा. लहानुजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. राजापेठ परिसरातील झोपडपट्टी आणि लहानुजी नगरात या घटना मंगळवारी उघडकीस आली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील चौकशी राजापेठ पोलीस करीत आहेत. रवि वानखडे हा १३ एप्रिल रोजी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती महादेव हिरामन वानखडे यांनी राजापेठ पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अमनने गळफास घेतल्याची माहिती शंकरप्रसाद पांडे यांनी राजापेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. शवविच्छेदनानंतर अमनचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.