शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमध्ये झोपण्यासाठी दोन तरुणांनी विचारणा केली; सकाळी मात्र एक फरार आणि एकाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:16 IST

Amravati : नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा नजीक असलेल्या ट्रक ले-बाय पार्किंगमध्ये एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

तिवसा (अमरावती) : नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील  तिवसा नजीक असलेल्या ट्रक ले-बाय पार्किंगमध्ये एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी  रोजी सकाळी उघडकीस आली. विमल अग्रावत (रा. राजकोट, गुजरात) असे मृतकाचे नाव आहे.

नवी भारवाडी येथील रहिवासी जानराव शामरावजी ठाकरे (वय ६०) हे आयआरबीच्या ट्रक पार्किंग स्थळावर चौकीदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कर्तव्यावर असताना एका रेसर दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. आम्हाला इथे थोडा वेळ झोपायचे आहे,  असे सांगून ते दोघेही तिथेच मुक्कामी थांबले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास फिर्यादी ठाकरे जेव्हा उठले, तेव्हा त्या दोन तरुणांपैकी एक जण झोपलेला होता तर दुसरा बाजूला बसून होता. त्यानंतर ठाकरे हे फ्रेश होण्यासाठी घरी गेले.

अर्ध्या तासानंतर, म्हणजेच ७:३० वाजता ते पुन्हा कामावर परतले असता, त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. तिथे थांबलेल्या दोन तरुणांपैकी एक जण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता, तर त्याचा दुसरा साथीदार तिथून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहाच्या जवळच रक्ताने माखलेला एक चाकू पोलिसांना मिळून आला आहे. घटनास्थळावर मिळालेल्या बॅगेतील मोबाईल फोन आणि आधार कार्डवरून मृतकाची ओळख विमल अग्रावत (रा. राजकोट, गुजरात) अशी पटवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth found dead in parking; companion flees in Amravati.

Web Summary : Amravati: A young man was found murdered at a truck parking lot near Tivasa. His companion, who had asked to sleep there, fled the scene. Police identified the deceased as Vimal Agrawat from Rajkot, Gujarat. A blood-stained knife was recovered.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती