हातात चाकू घेऊन दहशत दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:49 IST2019-07-16T23:49:30+5:302019-07-16T23:49:41+5:30
जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हाती धारदार चाकू घेऊन दहशत पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

हातात चाकू घेऊन दहशत दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हाती धारदार चाकू घेऊन दहशत पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
राजा कब्रस्तानी ऊर्फ आशिक अहमद निसार अहमद, अब्दुल राजीक शेख अहमद व हनुमान ऊर्फ एजोमोद्दीन (तिन्ही रा. मुजफ्फरपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी राजा व अब्दुल राजिकला पोलिसांनी अटक केली आहे.
मॉब लिचिंगच्या घटनेच्या अनुषंगाने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, या उद्देशाने आरोपी राजा व हनुमान या दोघांनी हातात चाकू घेऊन मॉब लिचिंग प्रकरणाच्या अनुषंगाने अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडीओ बनविला. त्यांच्या व्हिडीओत अश्लील शिवीगाळीचा व धर्मातील तेढ निर्माण करणाºया संभाषणाचा व्हिडीओ अब्दुल राजिक याने मोबाइलवर शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हॉट्सअॅप समूहावर व्हायरल केला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता होती. हा प्रकार नागपुरी गेट पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ व्हॉट्सअॅप समूहातील तरुणांची नावे मिळविली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
नागपुरी गेट पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम १५३ (अ), २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नितीन मगर, सहायक उपनिरीक्षक विलास पोवळेकर, पोलीस हवालदार प्रमोद गुडधे, अकील खान, संदीप देशमुख यांनी ही कामगिरी केली.