मेळघाटात दोन वर्षे वयाच्या नर अस्वलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST2021-04-02T04:13:12+5:302021-04-02T04:13:12+5:30
पान २ ची लिड वस्तापूर वर्तुळातील घटना: जंगलात आग, वन्यप्राणी सैरावैरा चिखलदरा : मेळघाट वन्यजीव विभागात अंतर्गत येणाऱ्या ...

मेळघाटात दोन वर्षे वयाच्या नर अस्वलाचा मृत्यू
पान २ ची लिड
वस्तापूर वर्तुळातील घटना: जंगलात आग, वन्यप्राणी सैरावैरा
चिखलदरा : मेळघाट वन्यजीव विभागात अंतर्गत येणाऱ्या वस्तापूर वर्तुळात एका शेतानजीक नाल्यात दोन वर्षीय नर अस्वल गुरुवारी पहाटे मृतावस्थेत आढळून आले. ते कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
वस्तापूर नजीकच्या हिरालाल जामूनकर यांच्या शेताला लागून असलेल्या नाल्यात नर अस्वल मृतावस्थेत आढळून आले. गुरुवारी सकाळी ११ वाजता मेळघाट वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक व्ही.एस. निकम, वनपाल अभय चंदेले व व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र विजयकर यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केल्यानंतर येथेच त्याला अग्नी दिला जाणार आहे. प्रत्यक्षदर्शींनी नर अस्वल कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिली. मात्र, व्याघ्र अधिकाऱ्यांनी ते बुधवारी मृत पावल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
बॉक्स
जंगलात आग वन्यप्राणी बाहेर
मेळघाट वन्यजीव विभागाच्या जामली खोंगडा परिसरातील पांढरा खडक भागात तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आग धुमसत आहे. त्यामुळे यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर वाघ, बिबट, अस्वल आदी प्राणी सैरावैरा पळून दुसऱ्या जंगलात स्थलांतरित होत असल्याची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून ती दोन वर्षीय अस्वल भरकटले असावे आणि अन्न-पाण्याअभावी त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्या अस्वलाचा मृत्यू नैसर्गिक की विषबाधेने किंवा शिकारीने, हे स्पष्ट होणार आहे. अस्वलाचा मृत्यूची निश्चित वेळदेखील अहवालाअंती स्पष्ट होणार आहे.
कोट
वस्तापूरनजीक एका शेताजवळील नाल्यात दोन वर्षांचे अस्वल मृतावस्थेत आढळून आले. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालाअंती कारण स्पष्ट होईल.
- अभय चंदेल, वनपाल