दुचाकीचोरास अवघ्या चार तासांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:29+5:302021-04-05T04:12:29+5:30
ब्राम्हणवाडा थडी : स्थानिक पोलिसांनी सुरळी शिवारातून दुचाकी चोरणाऱ्या पतीराम मल्लू पानसे (रा. गोहंडा, मध्य प्रदेश) या गुन्हेगारास अवघ्या ...

दुचाकीचोरास अवघ्या चार तासांत अटक
ब्राम्हणवाडा थडी : स्थानिक पोलिसांनी सुरळी शिवारातून दुचाकी चोरणाऱ्या पतीराम मल्लू पानसे (रा. गोहंडा, मध्य प्रदेश) या गुन्हेगारास अवघ्या चार तासांत ब्राह्मणवाडा ते मोर्शी रोडवर घाटलाडकी येथे नाकाबंदी करून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
शेतकरी गजानन देशमुख यांच्या तक्रारीनुसार, सुरळी शिवारातील त्यांच्या शेतापासून थोड्या अंतरावर प्रणित देशमुख यांचे शेत आहे. त्या शेतामध्ये पतिराम मल्लू पानसे (रा. गोहंडा, मध्यप्रदेश) हा सोकारी राहतो. गजानन देशमुख हे आपल्या शेतात एम.एच.२७ बीटी ४१०२ क्रमांकाच्या दुचाकीने ओलीत करण्यास गेले असता, त्यांनी त्याची दुचाकी संत्र्याच्या झाडाखाली उभी केली होती. ओलीत झाल्यानंतर सात वाजता ते घरी जाण्यास निघाले असता तेथे त्यांची दुचाकी दिसुन आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. परंतु दुचाकी मिळून आली नाही. त्यांच्या तक्रारीनुसार ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी तातडीने पथक रवाना केले व अवघ्या चार तासांतच आरोपीचा छडा लावण्यात ठाणेदार दीपक वळवी तसेच त्यांच्या पथकाला यश आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.