शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरी; अमरावतीतून चोरल्या; गडचिरोलीला विकल्या!

By प्रदीप भाकरे | Updated: June 18, 2025 16:41 IST

राजापेठ पोलिसांकडून सहा गुन्हे उघड : ५.२० लाख रुपयांच्या दुचाकी जप्त

प्रदीप भाकरे अमरावती : अमरावती शहराच्या विविध भागातून महागड्या दुचाकी चोरून त्या गडचिरोलीत नेऊन विकणाऱ्या दोन आरोपींसह त्या घेणाऱ्यासदेखील अटक करण्यात आली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी दोन स्थानिक चोरांसह गडचिरोलीच्या रिसिव्हरलादेखील जेरबंद केले. आरोपींकडून एकुण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांच्या अटकेमुळे शहर आयुक्तालयातील सहा गुन्हयांचा उलगडा झाला आहे.

साहिल अनिल राऊत (२०, रा. खरैया नगर, महेंद्र कॉलनी, अमरावती), पराग मनीष अग्रवाल (वय २४ वर्षे, रा. धनश्री कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती) व अझर फारूक हुसेन सिददीकी (वय २९ वर्षे, रा. रामनगर, गडचिरोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. १७ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. येथील दर्शन जावरकर यांची एम एच २७ डिआर ९४५२ ही ८० हजार रुपये किमतीची दुचाकी ३० मे रोजी एमआयडीसी रोडवरील गोल्डन टेम्पल, श्रीकृष्ण मंदीरासमोरून चोरीला गेली होती. ते दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांना दुचाकी दिसून आली नव्हती. त्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता. 

साहिलने दिली कबुलीराजापेठ पोलिसांनी माहितीच्या आधारे साहिल राऊतला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने आपण पराग अग्रवाल याच्या साथीने गोल्डन टेंपलसमोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. आपण राजापेठ व आयुक्तालयातील अन्य ठिकाणांहून चोरलेल्या दुचाकी गडचिरोली येथील अझर फारूक याला विकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपी साहिल व अझर फारूककडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीने त्या दुचाकी शहरातील विविध ठिकाणांहून चोरल्या होत्या.

यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त अरविंद चावरीया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट, उपनिरिक्षक मिलिंद हिवरे, हवालदार मनीष करपे यांच्या डीबी स्कॉडने ही कारवाई केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी