श्याम चौकातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:09 IST2021-04-29T04:09:52+5:302021-04-29T04:09:52+5:30

0000000000000000000000000000 बडनेरा येथे संशयित आरोपीला अटक अमरावती: बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल बगिया परिसरात पोलिसांनी मंगळवारी एका संशयिताला अटक केली. ...

Two-wheeler stolen from Shyam Chowk | श्याम चौकातून दुचाकी चोरी

श्याम चौकातून दुचाकी चोरी

0000000000000000000000000000

बडनेरा येथे संशयित आरोपीला अटक

अमरावती: बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल बगिया परिसरात पोलिसांनी मंगळवारी एका संशयिताला अटक केली. विशाल गोवर्धन रामटेके (४२ रा. राहुल नगर, बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. एएसआय गजानन बोरेवार यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विशाल रामटेके हा गुन्ह्याच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी विशालला ताब्यात घेऊन, त्याच्याविरुद्ध कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदविला.

000000000000000000000000000000

बडनेऱ्याच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती: बडनेरा हद्दीतील तेलीपुऱ्यातील एका ३५ वर्षीय तरुणाने साडीच्या साहाय्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. नितीन ज्ञानेश्वर बांडाबुचे (३५ रा. तेलीपुरा, बडनेरा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश मारोडकर यांनी केला.

00000000000000000000000000

तीन अवैध दारु अड्ड्यांवर धाडी

अमरावती : फ्रेजरपुरा व बडनेरा पोलिसांनी विविध ठिकाणच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकून तिघांना अटक केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी आशियाना क्लब ते ऑक्सिजन पार्कदरम्यानच्या रोडवर रोहीत रामदास आठवले (२६ रा. बिच्छुटेकडी) व आर्यन चेनबाबू पवार (२२ रा. वडाळी) यांना अवैध दारुची वाहतूक करताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दारु व दुचाकी असा एकूण ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बडनेरा पोलिसांनी पाळा रोडवरील रेशीम पार्कजवळ नरेंद्र धनराज गडलिंग (४४) याच्या ताब्यातून दुचाकी व दारु असा १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी नरेंद्र व त्याचा सोबती अजय गोले हे दोघेही पसार झाले. त्याचप्रमाणे तिलनगरात अतुल मधुकर ठाकरे (३१ रा. पवारवाडी) याच्या ताब्यातून ४०० रुपयांची अवैध दारु जप्त केली.

Web Title: Two-wheeler stolen from Shyam Chowk