नवसारी परिसरातून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:52+5:302021-02-13T04:14:52+5:30
अमरावती : नवसारी दारू भट्टीजवळून ५० हजार रुपये किमतीची दुचाकी एमएच २७-सी एल ९९८३ अज्ञाताने चोरून नेल्याची घटना बुधवारी ...

नवसारी परिसरातून दुचाकी चोरी
अमरावती : नवसारी दारू भट्टीजवळून ५० हजार रुपये किमतीची दुचाकी एमएच २७-सी एल ९९८३ अज्ञाताने चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली. फिर्यादी सुलतान शॉ, महेबुब शॉ (२२, रा. वलगाव बाजीपुरा) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविला. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.
---------------------------------------
गुलीस्तानगरातून दुचाकी चोरी
अमरावती : नागपुरीगेट ठाण्यांतर्गत गुलीस्तानगर येथून १२ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच २७-एएच४९१३ अज्ञाताने चोरून नेल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली. फिर्यादी शेख आरीफ शेख कालूृ (३३, रा. गुलीस्तानगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------------------
तिला थांबवून म्हटले ‘आय लव्ह यू’
अमरावती : शाळेत जात असलेल्या एका मुलीला युवकाने थांबवून आय लव्ह यु म्हटले तसेच तिचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना शहरातील एका ठाणे हद्दीत २ फेब्रवारी रोजी घडली. पोलिसांनी २७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
-------------------------------------------------------
राम चौकात जुगार पकडला
अमरावती : वलगाव पोलिसांनी येथील राम चौक शिराळा येथे कारवाई करून जुगार साहित्यासह ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. ज्ञानेश्वर अमृतराव नवरे (६४, रा. शिराळा) असे आरोपीचे नाव आहे.
----------------------------------------------
वल्लभनगरात दारू पकडली
अमरावती : राजापेठ पोलिसांनी येथील वल्लभनगरात कारवाई करून १३८० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई १० फेब्रवारी रोजी करण्यात आली. आरोपी सागर रामदास ठाकरे (३४, रा. वल्लभनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------------------------
भाजीबाजारात इसमाचा मृत्यू
अमरावती : येथील भाजीबाजार माळीपुरा येथील एका इसमाचा मृत्यू झाला. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुधीर साहेबराव बिलबिले (४४, रा. भाजीबाजार) असे मृताचे नाव आहे. मृत्यू नेमका कशाने झाला हे कळू शकले नाही. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.