४८ तासांत लावला दुचाकी चोरीचा छडा

By Admin | Updated: June 25, 2017 00:11 IST2017-06-25T00:11:05+5:302017-06-25T00:11:05+5:30

सलग दोन दिवसांत दोन घरांसमोरील दुचाकी चोराला अचलपूर पोलिसांनी दोन दिवसांच्या आतच मोटरसायकलसह अटक केली.

Two-wheeler stolen in 48 hours | ४८ तासांत लावला दुचाकी चोरीचा छडा

४८ तासांत लावला दुचाकी चोरीचा छडा

एकास अटक : अचलपूर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : सलग दोन दिवसांत दोन घरांसमोरील दुचाकी चोराला अचलपूर पोलिसांनी दोन दिवसांच्या आतच मोटरसायकलसह अटक केली.
शेख कलीम शेख निसार, बुंदेलपुरा अचलपूर असे आरोपीचे नाव आहे. १९ जूनच्या रात्री मोहम्मद शकील बागवानपुरा यांच्या घरासमोरून त्याची दुचाकी एमएच २७ एएन ४१३८ चोरीला गेली होती, तर आशुतोष मिश्रा, चावलमंडी यांच्या घरासमोरून त्यांची दुचाकी दुसऱ्या दिवशी रात्रीला चोरीला गेली होती. या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी कलम ३७९ अन्वये अपराध क्र. १४५/१७ व १४६/१७ गुन्हा नोंदविला होता.
दोन दिवसांत दोन दुचाकी चोरीला गेल्याने अचलपूर पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन तपासाची चक्रे फिरविली. अट्टल दुचाकी चोराचा छडा लावण्यासाठी पोलीस कामावर असतानाच त्यांना माहिती मिळाली. अचलपूरचे ठाणेदार सोनोने यांच्या मार्गदर्शनात विनोद राऊत, पुरुषोत्तम बावनेर, रवींद्र बावने, सचिन भोम्बे, राजू तायडे यांनी सापळा रचून चिखलदरा रोड शिव मंदिरजवळ दुचाकी चोर आरोपी शेख कलीम शेख निसार यास डिसकव्हर गाडी घेवून पळून जाताना अटक केली. आरोपी शे. कलीम याच्यावर या अगोदारसुद्धा चोरीचे गुन्हे दाखल आहे. आरोपीस अटक करून पोलिसांनी कोर्टात हजर करून आरोपीचा पीसीआर घेतला आहे.

Web Title: Two-wheeler stolen in 48 hours