गाडगेनगरातून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST2020-12-31T04:13:57+5:302020-12-31T04:13:57+5:30
सायकलवरही चोरट्यांचा डोळा अमरावती : शहरात दुचाकीचोरीच्या घटना थांबत नसताना सायकलही लंपास करण्यात येत आहेत. याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात ...

गाडगेनगरातून दुचाकी लंपास
सायकलवरही चोरट्यांचा डोळा
अमरावती : शहरात दुचाकीचोरीच्या घटना थांबत नसताना सायकलही लंपास करण्यात येत आहेत. याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात मनोहरलाल किसनचंद फब्यानी (४८, रा. मणिपूर ले-आऊट, व्हीएमव्ही) यांनी २९ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.
--------
आष्टी येथे इसमाचा गळफास
भातकुली : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आष्टी येथील कैलास वामनराव अरमाडे (३८) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ डिसेंबर रोजी ही घटना घडली. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला मृत घोषित केले. वलगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
-------
रेवसा येथील इसमाला सर्पदंश
टाकरखेडा संभू : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेवसा येथील इशाक शाह फतरू शाह (४८) .यांना २९ डिसेंबर रोजी सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वलगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
-----------