पीडीएमसीच्या गेटमागील दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:05 IST2021-08-02T04:05:54+5:302021-08-02T04:05:54+5:30

युवकाच्या पाठीवर चाकूने वार अमरावती : मित्राशी सुरू असलेल्या वादात समझौता करण्यास गेलेल्या युवकाच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी ...

Two-wheeler lamp behind the gate of PDMC | पीडीएमसीच्या गेटमागील दुचाकी लंपास

पीडीएमसीच्या गेटमागील दुचाकी लंपास

युवकाच्या पाठीवर चाकूने वार

अमरावती : मित्राशी सुरू असलेल्या वादात समझौता करण्यास गेलेल्या युवकाच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना जमील कॉलनीत २७ जुलै रोजी घडली. इमरान शाह उस्मान साह यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी समीर युनुस (२०, रा. कमेला ग्राऊंड) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

पँटच्या खिशातून ४० हजार चोरले

वलगाव : बँकेतून काढून आणलेले ४० हजार रुपये पँटच्या खिशातून लंपास केल्याची घटना रेवसा येथे २७ जुलै रोजी उघड झाली. कबुली जबाबावरून दिलेल्या तक्रारीनुसार वलगाव पोलिसांनी आरोपी देवीदास ऊर्फ कुंदन पंजाबराव कराळे (३०), योगेश गजानन टवलारे (२६, रा. रेवसा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

क्षुल्लक कारणावरून जीवे मारण्याची धमकी

अमरावती : वाहन लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून मद्यपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना साईनगरातील रनथंबोर अपार्टमेंट येथे २८ जुलै रोजी घडली. वल्लभदास केशरीमल गहलोत यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------

सराफ्यातून ६२ हजारांचा ऐवज लंपास

अमरावती : मंगळसूत्र गुंफण्याकरिता आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने असलेली लहान पर्स लंपास केल्याची घटना २८ जुलै रोजी सराफा बाजारात घडली. महिलेच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Two-wheeler lamp behind the gate of PDMC