फोटो पी १० वनोजा
बाहेरच्या पानासाठी
वनोजा बाग : भरधाव ट्रकने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. १० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास टाकरखेडा मोरे ते अंजनगाव मार्गावरील जायदे लेआऊटलगतच्या वळणावर हा अपघात घडला. अजय तसरे (३०, रा. टाकरखेडा मोरे) असे मृताचे, तर रामु मोकलकर (३२, टाकरखेडा मोरे) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
अजय बाळकृष्ण तसरे व रामू मोकलकर हे अंजनगाव येथे येत होते. जायदे लेआऊटजवळ असणाऱ्या वळणावर एमएच २७ एक्स ८५८७ या ट्रकने समोरून येणाऱ्या एमएच २७ बीवाय ६६७४ व एमएच २७ बीएल ३२८४ या दोन्ही दुचाकीला धडक दिली. तो ट्रक टाकरखेडा संत्रा मंडईत जात होता. यात दोन्ही दुचाकी रस्त्यावर कोसळल्या. अजय तसरे हा घटनस्थळी दगावला, तर रामू मोकलकर याला गंभीर अवस्थेत अंजनगाव ग्रामीण रुग्णालयातून पुढे इर्विनला हलविण्यात आले. ट्रकचालक महेंद्र किसनराव गोरले याने घटनास्थळी ट्रक न थांबविता गॅस गोडाऊनजवळ वाहन थांबविले. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------