पोहरा शिवारात दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:52+5:302021-03-18T04:13:52+5:30

--------- बेनोडा पोलिसांत विवाहितेकडून लैंगिक छळाची तक्रार बेनोडा-पुसला : बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी येथील ३० वर्षीय विवाहितेकडून माहेरहून ...

Two-wheeler hit in Pohra Shivara | पोहरा शिवारात दुचाकीला धडक

पोहरा शिवारात दुचाकीला धडक

---------

बेनोडा पोलिसांत विवाहितेकडून लैंगिक छळाची तक्रार

बेनोडा-पुसला : बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी येथील ३० वर्षीय विवाहितेकडून माहेरहून पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ तसेच लैंगिक छळाची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी भादंविचे कलम ४९८ अ, ३५४, ३५४ अ, ५०४, ५०६, ३४ अन्वये अभिजित अरुण चिंचमलातपुरे (३५), अरुण चिंचमलातरपुरे (५६), पलाश अरुण चिंचमलातपुरे (३२) व ५० वर्षीय महिला (सर्व रा. लोणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुकान खरेदी करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावला जात होता. ९ मार्च २०१५ ते २८ डिसेंबर २०२० दरम्यान हा घटनाक्रम घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. १६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

----------

वृद्धेला रिकाम्या जागेवरून मारहाण

परतवाडा : छोटा बाजार येथे रिकाम्या जागेच्या वादातून गुलाबराव नाकतोडे, प्रदीप रामभाऊ नारकतोडे, अतुल गुलाबराव नाकतोडे यांनी १३ मार्च रोजी थापडबुक्क्यांनी मारहाण केली व टिनाचे शेड मोडल्याची तक्रार ६० वर्षीय वृद्धेने केली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम १४३, ४४८, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

---------

मद्यपीकडून महिलेला मारहाण

चांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर येथे रवि रोहिदास पवार याने ३५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करीत बाजेच्या ठाव्याने मारहाण केली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी बादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला.

--------

वाठोड्यात इसमाला पावड्याने मारहाण

वाठोडा शुक्लेश्वर : दादाराव गोविंदा सहारे (५०) हा गावात मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करीत होता. त्याला हटकले म्हणून घरून पावडे आणून पतीला कपाळावर मारल्याची तक्रार ३० वर्षीय विवाहितेने दाखल केली. खोलापूर पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

------------

विदर्भ मिल येथे पुतण्याची काकाला मारहाण

अचलपूर :

Web Title: Two-wheeler hit in Pohra Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.