डफरीन हॉस्पिटलजवळ दुचाकीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST2021-05-16T04:12:40+5:302021-05-16T04:12:40+5:30
(फोटो आहे. ) अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयानजीक रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याने काही क्षणातच ...

डफरीन हॉस्पिटलजवळ दुचाकीला आग
(फोटो आहे. )
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयानजीक रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याने काही क्षणातच ती जळून खाक झाली. सुरक्षा रक्षकाने अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत दुचाकीचा कोळसा झाला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, सदर दुचाकी कोविड रुग्णालयात कार्यरत एका कर्मचाऱ्याची आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर पार्क करण्यापूर्वी त्यात पेट्रोल भरून आणले होते. सदर दुचाकीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुरक्षा रक्षक मोहमद शफी यांनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. फायरमन प्रफुल्ल इंगोले, चालक राजेश लडे, चंद्रकांत सूर्यवंशी व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल केला. याप्रकरणी पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र दुचाकी कुणाची आहे, हे वृत्त लििहस्तोवर पुढे आले नाही.