जिल्ह्यात २४ तासांत दोघे गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:35+5:302021-09-09T04:17:35+5:30
चंदसूर्या नाल्याच्या पुलावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा घसरला पाय, दर्यापुरात युवकाचा मृत्यू वनोजा बाग-दर्यापूर : अंजनगाव सर्जी तालुक्यातील लखाड-खिराळा मार्गावरील ...

जिल्ह्यात २४ तासांत दोघे गेले वाहून
चंदसूर्या नाल्याच्या पुलावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा घसरला पाय, दर्यापुरात युवकाचा मृत्यू
वनोजा बाग-दर्यापूर : अंजनगाव सर्जी तालुक्यातील लखाड-खिराळा मार्गावरील चंदसूर्या नाल्याच्या कमी उंचीच्या पुलावरून निमखेड बाजार येथील ग्रामपंचायत कर्मचारी वाहून गेला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
साहेबखाँ बनेरखाँ (५९, रा. निमखेड बाजार) असे मृताचे नाव आहे. खिराळा, निमखेड बाजार, हिरापूर, चिंचोना व सावरपाणी या गावांना अंजनगाववरून जाण्याकरिता असलेल्या लखाड-खिराळा मार्गात चंदसूर्या नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पुलाला पूर आला की, तो ओसरेपर्यंत प्रवाशांना अनेक तास ताटकळत बसावे लागते. ८ सप्टेंबरला पुलावरून पाणी वाहत असतानाच साहेबखाँ बनेरखाँ हे अंजनगावहून निमखेडकडे येत होते. पुलावरून पाणी असतानाही गावातील गिऱ्हे नामक युवकाच्या साह्याने दुचाकी लोटत ते पुलाच्या मध्यभागी आले. तेथे पाय घसरल्याने ते कोसळले व पुरात वाहून गेले. वृत्त लिहिस्तोवर साहेबखाँ यांची शोधमोहीम प्रशासनाकडून सुरू होती. साहेबखाँ हे तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते, असे निमखेड ग्रामस्थांनी सांगितले आहे.