वॉरंटचे दोन, जुगार ॲक्टमधील पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:14 IST2021-09-26T04:14:54+5:302021-09-26T04:14:54+5:30

अमरावती : वॉरंटचे दोन तर जुगार ॲक्टमधील पाच अशा सात आरोपींना राजापेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. ही कारवाई ...

Two of the warrants, five accused under the Gambling Act arrested | वॉरंटचे दोन, जुगार ॲक्टमधील पाच आरोपींना अटक

वॉरंटचे दोन, जुगार ॲक्टमधील पाच आरोपींना अटक

अमरावती : वॉरंटचे दोन तर जुगार ॲक्टमधील पाच अशा सात आरोपींना राजापेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. ही कारवाई राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एएसआय केशव मालवे, पोलीस हवालदार भारत वानखडे, राहुल फेरण व गणराज राऊत यांनी केली.

राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल भादंविच्या कलम ३२४, ३४ च्या गुन्हातील आरोपींचे पकड वारंट निघाले होते. पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान राजापेठ पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी प्रकाश उत्तमराव मांजलवार (५३, रा. बालाजी प्लॉट) व महेश ऊर्फ गुड्डू नथ्थुलाल यादव (४०, रा. तारासाहेब बगिचा) यांना अटक केली. त्याचप्रमाणे जुगार कायद्यातील आरोपी दिनेश अंबादास बमनोटे (५३), दिवानचंद केवलराम मतानी (६३), सुरेंद्र गणपतराव वाडेकर (५२), नागोराव काशीनाथ मेश्राम (५१) व अनील रामदास कुकडे (३८ सर्व रा. कंवरनगर) यांना अटक केल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.

Web Title: Two of the warrants, five accused under the Gambling Act arrested