एलबीटी विभागाने केले दोन वाहन जप्त
By Admin | Updated: May 11, 2014 22:47 IST2014-05-11T22:47:35+5:302014-05-11T22:47:35+5:30
स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरता मालाची वाहतूक करणारे दोन वाहने एलबीटी विभागाने जप्त केली आहे.

एलबीटी विभागाने केले दोन वाहन जप्त
अमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरता मालाची वाहतूक करणारे दोन वाहने एलबीटी विभागाने जप्त केली आहे. या वाहनात देयकाविना कापड जात असल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. एलबीटी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री ११ वाजता नांदगाव पेठ येथील बिझी लँड संकुलातून कापडाची वाहतूक करणार्या वाहनाची तपासणी केली असता या मालाची एलबीटी भरल्या नसल्याचे स्पष्ट झाले. सदर कापड पाच ते सात लाख रूपयाचा असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. एमएच २७ पी ९८१ व एमएच ०४ ईबी ४७३८ ही वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. अनोंदणीकृत व्यापार्यांचा माल वाहतूक करताना ही वाहने जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उपायुक्त रामदास सिद्धभट्टी यांच्या मार्गदर्शनात जकात अधीक्षक सुनील पकडे, रितेश देसाई, कमल देसाई, रूपेश गोलाईत यांनी केली आहे. करचुकव्या व्यावसायिकांवर करडीनजर ठेवली जाते. (प्रतिनिधी)