दोन दुचाकीचोर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:21+5:302021-08-22T04:15:21+5:30
चांदूर रेल्वे : शहरातून दुचाकी लंपास करणारे दोन चोरटे चांदूर रेल्वे पोलीस व अमरावती गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या जेरबंद केले. ...

दोन दुचाकीचोर पोलिसांच्या जाळ्यात
चांदूर रेल्वे : शहरातून दुचाकी लंपास करणारे दोन चोरटे चांदूर रेल्वे पोलीस व अमरावती गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या जेरबंद केले.
चांदूर रेल्वे शहरातून ११ ऑगस्ट रोजी आठवडी बाजारातून सुरेश काळे (रा. एकपाळा) यांची एमएच २७ बीसी ०७३८ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते व अमरावती गुन्हे शाखेचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास करून या प्रकरणात आरोपी राधेश्याम लच्छी राठोड (२१, ह.मु. लालखेड) व योगेश ऊर्फ गोलू रामभाऊ शेंडे (२६, रा. मालखेड) या दोघांना अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत.
------------------अलीकडे दुचाकीचोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांनी बाहेर कुठेही दुचाकी लावताना योग्य काळजी घ्यावी. हँडल लॉक करावे. पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे.
- मगर मेहते, ठाणेदार, चांदूर रेल्वे