दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना ३८ हजारांनी लुटले

By Admin | Updated: January 2, 2017 00:59 IST2017-01-02T00:59:30+5:302017-01-02T00:59:30+5:30

दोन दुचाकीवरून आलेल्या चार तरुणांनी चाकूच्या धाकावर दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना लुटले.

Two truck drivers with two wheelers looted Rs 38,000 | दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना ३८ हजारांनी लुटले

दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना ३८ हजारांनी लुटले

महादेवखोरीजवळील घटना : आरोपीचा शोध सुरू
अमरावती : दोन दुचाकीवरून आलेल्या चार तरुणांनी चाकूच्या धाकावर दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना लुटले. ही घटना रविवारी दुपारी महादेव खोरीजवळील एक्स्प्रेस हायवेवर घडली.
बुधवारा येथील रहिवासी अमोल राजेंद्र फणसे (१९) व त्याचे दोन मित्र नववर्षानिमित्त दोन दुचाकीने छत्री तलावकडे जात होते. दरम्यान महादेव खोरीजवळील एक्सप्रेस हायवेवरून ते जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या चार युवकांनी राजेंद्र फणसेला थांबविले व त्याला चाकूचा दाखविला. त्यामुळे राजेंद्र घाबरून गेला. दरम्यान चार अज्ञात युवकांनी राजेंद्रजवळील चार हजारांची रोख हिसकावून तेथून पळ काढला. राजेंद्र यांनी तत्काळ फे्रजरपुरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्याच कालावधीत त्या चार अज्ञातांनी पुन्हा त्याच मार्गावरील एका ट्रकला थांबविले. ट्रकचालक वीरेंद्र लखन यादव (रा. कलकत्ता) यालाही चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील १२ हजारांची रोख हिसकावून घेतली. ट्रकचालकाला लुटून ते चार अज्ञात तेथून निघून गेले. मात्र, काही अंतरावर त्यांनी पुन्हा एका ट्रकला थांबविले व ट्रकचालक राजेश रामप्रसाद यादवला चाकुला धाक दाखवून त्याच्याजवळील २२ हजारांची रोख व मोबाईल हिसकावून घेतला. दोन्ही ट्रक चालकांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. ते चार अज्ञात इसम हिन्दी भाषिक असून त्यांच्या दुचाकीचा क्रमांक एमएच २७ जीआर-३८८० व एमएच २७ डीके-६८६९ असल्याचे तक्रारकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. ते २५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. पुढील चौकशी पीएसआय भगवान कोळी करीत आहे.

Web Title: Two truck drivers with two wheelers looted Rs 38,000