दोन हजार ओटी अंबामातेच्या चरणी
By Admin | Updated: October 7, 2016 00:33 IST2016-10-07T00:33:34+5:302016-10-07T00:33:34+5:30
नवरात्रौत्सवात देवीला खणानारळांच्या ओटीला महत्त्वाचे स्थान आहे. महिला भाविक श्रेध्देने देवीला खणनाराळींची ओटी भरतात.

दोन हजार ओटी अंबामातेच्या चरणी
अंबा संस्थानची माहिती : ४५० साडी-पातळांची भेट
अमरावती : नवरात्रौत्सवात देवीला खणानारळांच्या ओटीला महत्त्वाचे स्थान आहे. महिला भाविक श्रेध्देने देवीला खणनाराळींची ओटी भरतात. अंबादेवीला पाच दिवसांत दोन हजार खणनारळाच्या ओटी भाविकांनी वाहिल्या. यावेळी अंदाजे ४५० साडी व पातळीही भाविकांनी देवीला वाहिले.
अंबा-एकवीरादेवीच्या दर्शनाला राज्यभरातून लाखो भाविक येतात. मंगळवारी सर्वाधिक भाविकांची गर्दी उसळली होती. प्रत्येक दिवसाला लाख, दड लाख भाविक दर्शन घेतात. या ठिकाणी परिसरात खणानारळाची ओटी विकणाऱ्यांचे ५० च्यावर दुकाने आहेत. एक दुकानदारांचा लाखोच्या घरात दहा दिवसांत व्यवसाय होत असल्याचे माहिती 'लोकमत'शी बोलताना विक्रेता अनिता गुलालकरी यांनी दिली. ५१ रुपयांत दोन खणानारळाच्या ओटींची विक्री करण्यात येते. यामध्ये दोन नारळ, २ खण, २ ओटी, पुडे , फुले व अगरबत्ती आदींचा समावेश असतो. विधीवत पूजा करून नागरिक मोठ्या श्रद्धेने देवीला ओटी भरतात. परिसरात इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते आहे. अंबा - एकवीरा देवीचे छायाचित्र, पूजेसाठी लागणारे कुंकू, प्रसाद, पेढा व इतर साहित्य विक्रीसाठी येथे किरकोळ व्यवसायिकांनी ठेवले आहेत. परिसरात लहान मुलांचे विविध खेळण्याची वस्तूंची दुकानेसुद्धा सजली आहेत. या वस्तूंची उलाढाल उत्सवादरम्यान कोट्यवधींच्या घरात आहे. परप्रांतीय व्यावसायिकांनीही नागरिकांना लागणाऱ्या विविध जीवनावश्यक वस्तंूची दुकाने थाटली आहेत. (प्रतिनिधी)