दोन संशयित आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:34+5:302021-03-15T04:13:34+5:30
अमरावती : अंधाराचा फायदा घेऊन मध्यरात्री चोरीसारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपले अस्तित्व लपवून फिरत असलेल्या दोन आरोपींना बडनेरा व ...

दोन संशयित आरोपींना अटक
अमरावती : अंधाराचा फायदा घेऊन मध्यरात्री चोरीसारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपले अस्तित्व लपवून फिरत असलेल्या दोन आरोपींना बडनेरा व सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. बडनेरा ठाणे हद्दीतील नवी वस्तीतील आठवडी बाजार परिसरातून आरोपी फिरोज खान मन्नान खान (२८, रा. इंदिरानगर, नवी वस्ती, बडनेरा) याला अटक केली. पोलिसांनी त्याला फिरण्याचे कारण विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. दुसरी कारवाई ही सिटी कोतवाली ठाणे हद्दीतील अमरावती मध्यवर्ती आगार परिसरात करण्यात आली. आरोपी विक्रम कृपाप्रसाद नांदणे (२०, रा. बसस्टॅँडजवळ, भातकुली) असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा मोबाइल, पर्स, पाकीट चोरण्याच्या उद्देशाने भटकत असल्याचा पोलिसांना संशय होता. दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.