शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा मेहेत्रे हत्ये प्रकरणात ठाणेदारासह दोन पोलीस शिपाई निलंबित, पोलीस आयुक्तांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 21:36 IST

अमरावती : राज्यभरात खळबळ उडविणा-या प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर दोन पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले

अमरावती : राज्यभरात खळबळ उडविणा-या प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर दोन पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास तसे आदेश जारी केले.निलंबितांमध्ये ठाणेदार राहुल आठवले, पोलीस शिपाई गौतम धुरंदर आणि ईशय खांडे यांचा समावेश आहे. या तिघांव्यतिरिक्त फ्रेजरपुरा ठाण्यातील अन्य काही पोलीस कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मेहेत्रे कुटुंबीयांची शुक्रवारी उशिरा रात्री भेट घेतली होती. मेहेत्रे कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीची तक्रार पाटील यांच्याकडे केली होती. पोलिसांनी कर्तव्यदक्षता राखली असती तर आमची मुलगी जिवंत असती, असे मत प्रतीक्षाच्या आई-वडिलांनी नोंदविले होते. त्याच भेटीदरम्यान ना. पाटील यांनी मर्यादित कालावधीत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त पी. डी. डोंगरदिवे यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी चौकशी अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला. ठाणेदार आणि इतर दोघांवर ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.काय आहे प्रकरण ?गुरुवारी भरदुपारी वृंदावन कॉलनीत प्रतीक्षा मेहेत्रेची हत्या करण्यात आली. त्यापूर्वी बुधवारी सायंकाळी प्रतीक्षा व तिच्या वडिलाने आरोपी राहुल भडविरुद्ध तक्रार नोंदविली होती. १५, २२ नोव्हेंबरला प्रतीक्षाने फ्रेजरपुरा ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार नोंदविली. तथापि, ठाणेदार राहुल आठवले यांनी त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही, आरोपीला बोलावून समज व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे सौजन्य आठवले यांनी दाखविले नाही.एसीपी दर्जाच्या चौकशी अधिका-याने दिलेल्या अहवालानुसार ठाणेदारांसह तिघे दोषी आढळले. त्यांना निलंबित करण्यात आले.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :Policeपोलिस